JOIN US
मराठी बातम्या / Viral / Nagin Dance Video : पुंगी वाजताच 2 वृद्धांच्या अंगात संचारलं; पाहता पाहता आजोबा बनले 'नागिण'

Nagin Dance Video : पुंगी वाजताच 2 वृद्धांच्या अंगात संचारलं; पाहता पाहता आजोबा बनले 'नागिण'

दोन आजोबांचा नागिण डान्स व्हिडीओ (Old man nagin dance video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 मार्च : नागिन डान्स (Nagin Dance) तसा तुमच्यासाठी काही नवा नाही. लग्नाची हळद असो, लग्नाची वरात असो अशा बऱ्याच ठिकाणी तरुणांना पुंगीच्या धूनवर थिरकताना तुम्ही पाहिलं असेल. नागिन डान्स करताना पाहिलं असेल. पण आता दोन आजोबांचा नागिण डान्स व्हिडीओ (Old man nagin dance video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पुंगी वाजताच आजोबांच्या अंगात संचारलं आणि वृद्ध व्यक्ती नागिण बनले. दोन वृद्ध पुंगीच्या धूनवर थिरकले आहेत. त्यांनी असा नागिण डान्स केला आहे की पाहून तरुणांनाही लाज वाटेल. पुंगीची धून ऐकू येताच दोन्ही आजोबा स्वतःला कंट्रोल करू शकले नाही. दोघंही मैदानात आमनेसामने आले आणि नागिन डान्स करू लागले. एक गारूडी बनला तर एक नागिण. गारूडी बनून एक आजोबा पुंगी वाजवण्याची अॅक्टिंग करत होते तर दुसरे आजोबा त्यावर नागिण बनून नागिणीसारखा डान्स करत होते.

संबंधित बातम्या

Giedde नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आजोबांचा हा भन्नाट नागिण डान्स सर्वांना आवडला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हे वाचा -  अजबच! म्हणे, ‘पार्कमध्ये फिरायला गेलो आणि पायच हरवला’, शोधून देणाऱ्याला बक्षीस आजोबांच्या या नागिण डान्सचं बऱ्याच नेटिझन्सनी कौतुक केलं आहे. आजोबांच्या या डान्सनी माझं मन जिकलं, व्वा काय जान्स आहे, आजोबा थोडा आराम करा, अशा प्रतिक्रिया सोशल मीडिया युझर्सनी दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या