JOIN US
मराठी बातम्या / Viral / Wedding Fight : एकाच महिलेसोबत डान्स करण्यासाठी लग्नात 2 पुरुषांचा राडा; शेवटी काय झालं पाहा VIDEO

Wedding Fight : एकाच महिलेसोबत डान्स करण्यासाठी लग्नात 2 पुरुषांचा राडा; शेवटी काय झालं पाहा VIDEO

एका महिलेसाठी लग्नात डान्स फ्लोअरवर दोन पुरुष आपसात भिडले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जुलै : लग्न म्हणजे डान्स आलाच. अशाच एका लग्नातील डान्सचा व्हिडीओ व्हाययरल होतो आहे. पण काही वेळातच हा डान्स फ्लोअर डब्लूडब्लूएफचा आखाडा बनला. दोन तरुणांनी लग्नात राडा केला. एकाच महिलेसोबत डान्स करण्यासाठी दोघंही आपसात भिडले. लग्नातील भांडणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. लग्नात आनंदात, उत्साहात नाचता नाचता लग्नाचं हे वातावरण अचानक युद्धात बदललं. व्हिडीओत पाहू शकता एका बाजूला स्टेजवर नवरा-नवरी बसले आहेत. काही पाहुणे समोर खुर्चीवर बसले आहेत. तर काही तरुण डान्स फ्लोअरवर डान्स करताना दिसत आहेत. थोड्या वेळात एक पुरुष तिथं एका महिलेला घेऊन डान्स करायला येतो. त्यानंतर जे घडतं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल. हे वाचा -  काय म्हणावं आता! पोलिसानेच लहान मुलासारखा पसरलं भोकाड; साधं ब्लड टेस्टसाठी सॅम्पल देताना हवा टाइट जसा पुरुष त्या महिलेसोबत डान्स करू लागतो. तसा तिथं असलेला दुसरा पुरुष त्या दोघांकडे रागाने पाहतो. त्यानंतर तो महिलसोबत डान्स करणाऱ्या पुरुषाला उचलतो आणि मग दोघांमध्ये सुरू होते फायटिंग. महिला त्यांच्यामध्ये मध्यस्थी करून त्यांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करते. काही लोकही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात. पण दोघांपैकी एकही ऐकायला तयार नसतो.

दिपक कुमार नावाच्या युट्यूब युझरने आपल्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्टनुसार एका महिलेसोबत डान्स करण्यासाठी दोघांमध्ये भांडण झाल्याचं सांगण्यात आलं आहे. पण प्रत्यक्षात तुम्ही व्हिडीओ पाहिला तर जेव्हा पुरुष त्या महिलेला घेऊन डान्स फ्लोअरवर नाचायला येतो, तेव्हा तिथं उभ्या असलेल्या दुसऱ्या पुरुषाला त्याचा धक्का लागतो. त्यामुळे ती व्यक्ती संतप्त झाल्याचं दिसतं. हे वाचा -  भरधाव ट्रकवर ‘शक्तिमान’सारखा स्टंट तरुणाला पडला भारी; काय भयंकर अवस्था झाली पाहा VIDEO कारण काही असलं तरी लग्नात असं भांडण करणं म्हणजे धक्कादायक आहेत. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बऱ्याच जणांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या