मुंबई 27 डिसेंबर : आसामच्या जोऱ्हाट जिल्ह्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन वन कर्मचाऱ्यांसह किमान 13 लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी सोमवारी याबाबतची माहिती दिली. यात पिसाळलेल्या बिबट्याने जोऱ्हाट जिल्ह्यात एकच धुमाकूळ घातला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यात बिबट्याने इमारतीच्या कुंपणावरून मोठी झेप घेत थेट रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारवर हल्ला केला आहे. Video : अजगराजवळ जाण्याची चुक करुन बसली, पुढच्या क्षणी जे घडलं ते पाहून येईल पोटात गोळा जोऱ्हाट जिल्ह्यातील छेनीजन येथील रेन फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ही घटना घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
जोऱ्हाट जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहनलाल मीना यांनी एएनआयला सांगितलं की, या हल्ल्यात तीन वन कर्मचाऱ्यांसह १३ जण जखमी झाले आहेत. जोऱ्हाट जिल्ह्यातील वन अधिकाऱ्याने सांगितलं की, सकाळी 10.30 च्या सुमारास त्यांना माहिती मिळाली की बिबट्याने परिसरात काही लोकांवर हल्ला केला आहे. बेडकाने तोंडात पकडलं अन् मांजराने केला हल्ला, तरी सापाने घेतली नाही माघार, शेवटी..लढाईचा Live Video “जेव्हा आमची टीम परिसरात पोहोचली तेव्हा बिबट्याने आमच्या दोन कर्मचार्यांवर हल्ला केला. आमची दुसरी टीमही घटनास्थळी पोहोचली आणि आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून बिबट्याला शांत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या तीन टीम आता तिथे आहेत,” असं वन अधिकाऱ्याने सांगितलं. याआधी 12 डिसेंबर रोजी छत्तीसगडमधील मनेंद्रगड जिल्ह्यातील कुंवरपूर वनपरिक्षेत्रातील गधौरा गावात बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता.