JOIN US
मराठी बातम्या / Viral / 100 वर्षाचे आजोबा चढले बोहल्यावर; लग्नाची ही आगळीवेगळी कथा एकदा वाचाच

100 वर्षाचे आजोबा चढले बोहल्यावर; लग्नाची ही आगळीवेगळी कथा एकदा वाचाच

आज जी घटना समोर आली आहे ती अतिशय आगळीवेगळी आहे. यात एका व्यक्तीने आपला 100 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या पत्नीसोबत दुसऱ्यांदा लग्न केलं

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलकाता 18 फेब्रुवारी : लग्न हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा क्षण असतो, असं म्हटलं जातं. अनेकदा लग्नाच्या अतिशय रंजक (Unique Marriage Stories) आणि कधीकधी हैराण करणाऱ्या घटनाही आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळतात. मात्र, आज जी घटना समोर आली आहे ती अतिशय आगळीवेगळी आहे. यात एका व्यक्तीने आपला 100 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या पत्नीसोबत दुसऱ्यांदा लग्न केलं (Old Man Married at Age of 100). त्यांच्या शंभराव्या वाढदिवसी काहीतरी खास करायचं असं त्यांच्या नातवंडांनी ठरवलं होतं. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या विश्वनाथ सरकार यांनी बुधवारी आपली 90 वर्षीय पत्नी सरोधवानी यांच्यासोबत भव्य विवाह केला.

80 वर्षीय आजीबाईंची इंग्लिश ऐकून घालाल तोंडात बोटं; VIDEO चा इंटरनेटवर धुमाकूळ

या वृद्ध दाम्प्त्याची सून गीता सरकारने सांगितलं की, ‘ही कल्पना तेव्हा सुचली जेव्हा काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर असंच काही पाहिलं. यानंतर मी कुटुंबातील इतर सदस्यांनाही याबद्दल सुचवलं आणि सगळ्यांना ही कल्पना आवडली’. या कपलचं लग्न 1953 साली झालं होतं. या कपलची मुलं, नातवांडं आणि परतवांडं इतर राज्यांमध्ये राहतात. मात्र, या लग्नासाठी त्यांनीही हजेरी लावली. या कपलच्या नातंवांडांमधील एक पिंटा मोंडोलने म्हटलं की नवरी नवरदेवाच्या कुटुंबात येते, त्यामुळे आम्ही त्यानुसारच प्लॅनिंग केलं. यानुसार आजोबांनी आपल्या गावातील घरी ठेवण्यात आलं. तर आजीला लग्नाच्या दोन दिवस आधी शेजारच्या गावातील घरी ठेवलं गेलं.

सरप्राईझ कसला हा तर मोठा शॉक! गर्लफ्रेंडने मास्क हटवताच बॉयफ्रेंड हादरला कारण…

नातींनी 90 वर्षाच्या नवरीला तयार होण्यासाठी मदत केली. तर नातू आजोबांना तयार करत होते. विश्वनाथ सरकार बुधवारी आपल्या नवरीला आणण्यासाठी तिच्या घरी घोडीवर बसून गेले. नवरदेव तिथे पोहोचताच फटाके फोडण्यात आले. दोघांनाही अगदी नवरी-नवरदेवाप्रमाणे सजवलं गेलं होतं. लग्नासोबतच भोजनाची व्यवस्थाही केली गेली होती आणि यासाठी शेजाऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या