World War II: याच दिवसामुळं करोडो लोकांना गमावावा लागला जीव; काय आहे 1 सप्टेंबरचा काळा इतिहास?
मुंबई, 1 सप्टेंबर: युरोपमध्ये 83 वर्षांपूर्वी 1 सप्टेंबर रोजी दुसरं महायुद्ध (World War II) सुरू झालं. दुसरं महायुद्ध सुरु होण्यामागं अनेक कारणं होती. 1 सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीनं (Germany) पोलंडवर आक्रमण केल्यानं हे युद्ध सुरू झालं. या युद्धामागं अनेक कारणं होती, ज्यामागं अनेक वर्षांची पार्श्वभूमी होती. रशिया युक्रेन युद्धाबाबतही असंच काहीसं बोललं जात आहे. हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात असेल का? दुसऱ्या महायुद्धाचा पाया कशामुळं घातला गेला आणि आज आपण तीच परिस्थिती पाहतो आहोत का हे समजून घेण्यासाठी 1 सप्टेंबर ही तारीख खूप महत्त्वाची आहे. या युद्धाने अनेक बदल घडवून आणले- दुसरे महायुद्ध हे आधुनिक जगातील सर्वात विनाशकारी युद्ध होतं. यात सहा वर्षांच्या कालावधीत 8 कोटी लोक मरण पावले. या युद्धात प्रथमच अण्वस्त्रांचा वापर करण्यात आला. त्यामुळं संयुक्त राष्ट्रसंघासारखी संघटना निर्माण झाली आणि दोन महासत्तांमध्ये वर्चस्वाचा लढा सुरू झाला आणि त्याचं रूपांतर शीतयुद्धात झालं. आज परिस्थिती अशी आहे की, या दोन महासत्तांमधील संघर्ष हे रशिया-युक्रेन युद्धाचं एक कारण आहे. पहिले महायुद्ध आणि हिटलरचे चुकीचे विचार- 1939 मध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या मागं पहिल्या महायुद्धानंतर निर्माण झालेली परिस्थिती कारणीभूत आहे, हे बहुतेक इतिहासकार मान्य करतात. 1919 मध्ये झालेल्या करारात पहिल्या महायुद्धाला प्रामुख्यानं जर्मनीला जबाबदार ठरवलं गेलं आणि कडक आर्थिक आणि लष्करी निर्बंध लादले गेले. पण या कराराला दुसऱ्या महायुद्धाचं कारण म्हणणं म्हणजे हिटलरच्या नाझी विचारसरणीला एकप्रकारे मान्यता देणंच ठरेल. या कराराला दुसऱ्या महायुद्धाचं थेट कारण मानणे चुकीचं ठरेल, असेही काहींनी म्हटले. पहिल्या महायुद्धात हिटलर हा सैनिक होता- पहिल्या महायुद्धात हिटलर स्वतः जर्मन सैनिक होता. मुळात ते सैन्यात संदेशवाहक दूत होता. त्याच्या शौर्याबद्दल त्याचे कौतुक झाले आणि युद्धादरम्यान तो दोनदा जखमी झाला होता. युद्धानंतर, हिटलर जर्मन सैन्यात एक गुप्तचर एजंट बनला आणि जर्मन वर्कर्स पार्टीमध्ये काम करण्यासाठी नियुक्त झाला. येथेच तो साम्यवादी विरोधी, यहुदी विचारसरणीनं प्रेरित झाला आणि त्याने स्वतःची यहुदी विरोधी विचारसरणी विकसित केली. हेही वाचा- मदतीसाठी पोहोचलेल्या सैन्यावरच पूरग्रस्त नागरिकांचा हल्ला; पाकिस्तानमधील Video, काय आहे प्रकरण? ज्यूंचा द्वेष- 1919 मध्ये हिटलरनं असं म्हटलं होतं की, ज्यूंचा संपूर्ण संहार करणं आवश्यक आहे. हळूहळू हिटलरनं जर्मन वर्कर्स पार्टीमध्ये लोकप्रियता मिळवली, त्याला मोठ्या प्रमाणात अनुदान मिळालं. तो जर्मन राजकारणाच्या शीर्षस्थानी पोहोचला आणि 1933 मध्ये जर्मनीचा चान्सलर बनला. लवकरच तो देशाच्या नाझी संसद संघटनेत सुप्रीम कमांडर बनला. युरोपीय देश कमजोर होत होते- 1930 च्या दशकात युरोपातील जर्मनीच्या आसपासचे देश कमकुवत होत होते आणि जर्मनी हिटलरच्या नेतृत्वाखाली एकत्र येत होती. स्पॅनिश गृहयुद्ध, ऑस्ट्रियाचा ताबा, चेकोस्लोव्हाकियावरील आक्रमण, अशा अनेक घटनांनी युरोपला युद्धाकडे ढकलले. यानंतर 1 सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीने पोलंडवर केलेला हल्ला हे पहिल्या महायुद्धाचं कारण ठरलं. आजची परिस्थिती खूप वेगळी - पण अनेक बाबतीत आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. रशिया हिटलरसारखा इतर कोणत्याही देशावर हल्ला करत नाही. सध्या पाश्चात्य देश आणि रशिया यांच्यात आर्थिक युद्धासारखी परिस्थिती आहे. युक्रेनला युरोप आणि पश्चिमेकडील देश सहकार्य करत आहेत. पण युक्रेनचा आरोप आहे की, पाश्चात्य देश तोच मार्ग अवलंबत आहेत, जो दुस-या महायुद्धात हिटलरविरोधात अवलंबला होता. पुतिन हे हिटलरच्या मार्गावर चालत असल्याचा आरोप पाश्चात्य देश करत आहेत. त्याचवेळी आपण आपल्या सार्वभौमत्वासाठी नाटोला रोखण्यासाठी युक्रेनवर लष्करी कारवाई करत आहे, असं रशियानं म्हटलं आहे. काहीही असलं तरी परिस्थिती तितकी गंभीर नाही जितकी भीती युद्धाच्या सुरुवातीला व्यक्त केली जात होती.