JOIN US
मराठी बातम्या / विदेश / तालिबानी राजवट परतली! घट्ट कपडे घातले म्हणून तरुणीची केली 'अशी' हत्या

तालिबानी राजवट परतली! घट्ट कपडे घातले म्हणून तरुणीची केली 'अशी' हत्या

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिाबानी (Taliban) राजवट परतताच सामान्य व्यक्तींवरील अन्यायमध्ये वाढ होऊ लागली आहे. तालिबानी राजवटीत महिलांना एकट्यानं बाहेर पडण्यास बंदी आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये  (Afghanistan) तालिाबानी (Taliban) राजवट परतताच सामान्य व्यक्तींवरील अन्यायमध्ये वाढ होऊ लागली आहे. युद्धग्रस्त बाल्ख राज्यात तालिबान्यांनी एका 21 वर्षांत्या तरुणीची हत्या करण्यात आली. घट्ट कपडे घातले आणि पुरुष नातेवाईला सोबत न घेता घराबाहेर पडली इतकाच तिचा अपराध होता. तालिबानी राजवटीमध्ये महिलांना एकट्यानं घराच्या बाहेर पडण्याची बंदी आहे. याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार समर कांदिया गावात तालिबानी कट्टरपंथींनी या तरुणीची गोळ्या झाडून हत्या केली. या गावावर तालिबानी राजवट आहे. बाल्ख राज्याच्या पोलिसांचे प्रवक्ते आदिश शाह आदिल यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणीचे नाव नाजनीन होते. तसेच ती 21 वर्षांची होती. बुरखा घातल्यानंतरही हत्या नाजनीन घराबाहेर पडताच तालिबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर हल्ला केला. ती बाल्ख राज्याची राजधानी मजार-ए-शरीफला (Mazar-e Sharif) जाण्यासाठी वाहनामध्ये बसली होती. त्याचवेळी तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणीनं बुरखा घातला होता. तसेच तिचे शरीर आणि चेहरा दोन्ही झाकले होते. तालिबानकडून मात्र हा हल्ला झालाच नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करत असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. तालिबान राजवट परतल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये मुली आणि महिलांचे अपहरण करण्यात येत आहे. त्यानंतर त्यांचे तालिबानी दहशतवाद्यांसोबत जबरदस्तीनं लग्न लावण्यात येते. पाकिस्ताननंतर बांगलादेशातही कट्टरपंथीयांची मुजोरी; हिंदुंच्या घरांवर हल्ला, मंदिरातील मूर्तींचीही तोडफोड महिलांवर कठोर निर्बंध तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानात महिलांवर कठोर निर्बंध लादले आहेत. महिलांना डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर झाकण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांना बाहेर काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. इतकच नाही तर मुलींच्या शिक्षणावरही बंदी घालण्यात आली आहे. फरयाब (Faryab) भागातील काही भागात महिलांचे साहित्य विक्री करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तालिबानचे नियम मोडले तर दहशतवाद्यांकडून कठोर शिक्षा देण्यात येते, अशी व्यथा फरयाब भागातील स्थानिकांनी मांडली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या