JOIN US
मराठी बातम्या / विदेश / धक्कादायक! डॉक्टरांनी केलं मृत घोषित, दफन करण्याआधीच उठून बसली महिला

धक्कादायक! डॉक्टरांनी केलं मृत घोषित, दफन करण्याआधीच उठून बसली महिला

डॉक्टरांनी मृत्यपत्र दिल्यानंतर थरथर कापायला लागली महिला, पुढे जे झालं ते वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पेराग्वे, 18 एप्रिल : सिनेमांमध्ये तुम्ही मृत झालेली व्यक्ती अखेरच्या क्षणाला उठून बसते, हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण असा प्रसंग खऱ्या आयुष्यात घडला तर?. विश्वास नाही बसणार पण असा प्रकार खरच घडला आहे. दक्षिण अमेरिकेच्या पेराग्वेमध्ये असा प्रकार घडला. येथे डॉक्टरांनी एका महिलेला मृत घोषित केले. महिलेला मृत घोषित केल्यानंतर या महिलेच्या घरच्यांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. मात्र त्यानंतर जे घडलं ते सर्वांसाठी धक्कादायक होते. इंडिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ग्लेडिस रॉड्रोगिझ दुआर्टे यांना गर्भाशयाचा कर्करोग आहे. दोन दिवसांपूर्वी अचानक त्यांचा रक्तदाब वाढला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी 9.30 वाजता त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर, डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. डॉ. हेरिबर्टो विरा यांनी तपासणी केल्यानंतर ग्लेडिस यांची तब्येत खालावली. त्यानंतर 11.20 दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वाचा- डोकं दुखायला लागलं म्हणून केलं अ‍ॅडमिट, X-ray पाहून डॉक्टरांनाच भरली धडकी ग्लेडिस यांच्या मुलीने, “डॉक्टरांनी विचार केला की, माझ्या आईचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला अंत्यसंस्काराची तयारी करण्यास सांगितले. एवढेच नाही तर, त्यांनी आम्हाला मृत्यू प्रमाणपत्रही दिले. मात्र काही वेळाने असं काही घडलं की आम्हाला धक्का बसला”, असे सांगितले. वाचा- ज्याचं कोणी नाही त्याच्यासाठी पुढे आले पोलीस, त्या महिलेवर केले अंत्यसंस्कार डॉक्टरांनी ग्लेडिसचे मृत्यू प्रमाणपत्र दिल्यानंतर. घरच्यांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. मृतदेह दफन करण्याआधीच महिलेचे शरीर थरथर कापायला लागला. महिले थरथरायला लागल्यानंतर तिच्या घरचे घाबरले. वाचा- VIDEO : लॉकडाऊनला कंटाळून रस्त्यावर आली महिला, पोलीस येताच काढले कपडे आणि… यानंतर या महिलेला पुन्हा पेराग्वे येथील रुग्णलयात दाखल करण्यात आले. तिथे गेल्यावर लक्षात आले की ही महिला जिवंत आहे. सध्या या महिलेवर उपचार सुरू आहेत. तर, ग्लेडिसच्या घरच्यांनी या डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. संपादन, संकलन-प्रियांका गावडे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या