JOIN US
मराठी बातम्या / विदेश / ChatGPT मुळे सॉफ्टेवेअर इंजिनिअर्सची नोकरी धोक्यात! वाचा, काय आहे सत्य

ChatGPT मुळे सॉफ्टेवेअर इंजिनिअर्सची नोकरी धोक्यात! वाचा, काय आहे सत्य

सध्या टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात चॅट जीपीटीची जोरदार चर्चा आहे. हे टूल सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची जागा घेईल का? हा प्रश्न अनेकांना सतावतोय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 एप्रिल :  सध्या टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात चॅट जीपीटीची जोरदार चर्चा आहे. चॅट जीपीटी हा एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रोग्राम आहे. इतरांशी नैसर्गिक पद्धतीने संवाद साधण्यासाठी त्याचं डिझाइन केलं गेलं आहे. ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ओपन एआय) कंपनीने त्याची निर्मिती केली आहे. हा प्रोग्राम तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण, चॅट जीपीटी या एआय टूलला नोव्हेंबर 2022मध्ये लाँच झाल्यानंतर काही महिन्यांतच कोट्यवधी फॉलोअर्स मिळाले आहेत. हा एआय चॅटबॉट कोड लिहिण्यापासून वेबसाइट बनवण्यापर्यंतची काहीही कामं करू शकतो. असंही म्हटलं जात आहे की, चॅट जीपीटी प्रोग्रामरपेक्षा जलद आणि चांगल्या प्रकारे कोड लिहू शकतं. एका नवीन अहवालात असं म्हटलं आहे की, हे टूल इतकं कार्यक्षम आहे की त्याच्या कौशल्याच्या आधारे ते प्रोग्रामर्स लेव्हलचा जॉब सहज मिळवू शकतं. त्यामुळे आता असा प्रश्न निर्माण झाला आहे, की हे टूल सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची जागा घेईल का? ‘टेक गिग’नं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. चिंता वाढली तरी… चॅट जीपीटीमुळे तंत्रज्ञान क्षेत्रामधल्या कर्मचाऱ्यांची चिंता वाढली असली तरी हे टूल सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची जागा घेणार नाही. चॅट जीपीटी (जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर) मानवी प्रोग्रामरची जागा घेऊ शकत नाही. चॅट जीपीटी नावाचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर मानवी इन्पुटला प्रतिसाद देताना नैसर्गिक भाषेत उत्तरं देण्यासाठी बनवलेलं आहे. ते अद्याप बाल्यावस्थेत आहे. त्यामुळे ते प्रोग्रामिंग एक्सपर्ट्सची जागा घेऊ शकत नाही.

चॅट जीपीटी हे एक प्रभावी तंत्र आहे, जे प्रोग्रामरद्वारे तयार केलेल्या मजकूराची गुणवत्ता वाढवू शकतं आणि सुधारू शकतं; पण ते त्यांची जागा घेऊ शकत नाही. प्रोग्रामिंगसाठी आवश्यक असलेले क्लिष्ट तर्क, समस्या सोडवण्याची क्षमता आणि सर्जनशीलता यांची नक्कल संभाषणात्मक बॉट्स करू शकत नाहीत. चॅट जीपीटी हे प्रोग्रामरसाठी मजकूर निर्मितीची गती वाढवण्यासाठी आणि अचूकता सुधारण्यासाठी एक उत्तम साधन आहे. काय आहे कारण? 1) चॅट जीपीटी आता प्रोग्रामिंग करत असताना कोड आउटपुट करतं. हे तंत्र कोडची निर्मिती करू शकतं; मात्र ते वापरू शकत नाही. ही क्षमता फक्त प्रोग्रामर्सकडे आहे. SWEs ने चॅट जीपीटीचं विद्यमान कोडिंग-संबंधित आउटपुट हाताळणं गरजेचं आहे. कारण ते आउटपुट सामान्य माणसांसाठी निरर्थक आहे. 2) चॅट जीपीटी अधूनमधून सदोष कोडसह चुकीचे प्रतिसाद देतं. त्यामुळे कोणतीही कंपनी त्यांच्या सॉफ्टवेअर इंजिनीअर्सच्या जागी एआय नेमण्याची जोखीम घेणार नाही. 3) चॅट जीपीटीला सध्या प्रॉब्लेमॅटिक कोड डीबग करण्यात समस्या येत आहे. अगदी सरळ, स्वतंत्र कोड ब्लॉक्समध्येही जीपीटीची हीच अवस्था आहे. विशेषतः मोठ्या, गुंतागुंतीच्या कोडबेसबाबत ही समस्या सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे एआयचा कोड डीबग करण्यासाठी मानवी प्रोग्रामर्सची आवश्यकता भासत असेल, तर त्यांना कामातून काढू शकत नाही. टीव्हीवरील प्रोग्राम बघूनही क्रॅक करता येईल UPSC परीक्षा? ‘हे’ कार्यक्रम मिस करूच नका 4) चॅट जीपीटी वापरून क्लिष्ट अ‍ॅप्लिकेशन्स तयार करण्यासाठी त्यात कॉम्प्लेक्स प्रॉम्प्ट प्रदान केले गेले पाहिजेत. त्यामध्ये तांत्रिक कौशल्य आणि ‘प्रॉम्प्ट इंजिनीअरिंग’ कौशल्य या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. हे प्रॉम्प्ट तयार करण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनीअर्स हा सध्या सर्वांत योग्य गट आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची जागा घेण्याऐवजी, चॅट जीपीटी त्यांचं काम सुधारण्याचं एक अद्भुत साधन म्हणून काम करील. ज्यामुळे त्यांना काही प्रोग्रामिंग टास्क्स अधिक वेगात पूर्ण करण्यात मदत होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या