मॉस्को, 5 एप्रिल: राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin)यांची रशियाचे सेक्सी पुरुष म्हणून निवड करण्यात आली आहे. दोन हजार लोकांना याबाबत विचारल्यानंतर त्यांनी आपलं मत व्लादिमीर पुतीन यांना दिले आहे. 68 वर्षे वय असलेल्या व्लादिमीर पुतीन यांची रशियात चर्चा आहे. व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांची रशियाचे सेक्सी पुरुष म्हणून निवड करण्यात आली आहे. दोन हजार लोकांची मतं जाणून घेतल्यानंतर पुतीन यांना कौल देण्यात आला आहे. 68 वर्षे वय असलेल्या व्लादिमीर पुतीन यांची अजूनही रशियातील नागरिकांवर जादू कायम असल्याचं यातून दिसत आहे. सुपरजॉब नावाच्या जॉब बोर्ड साइट सर्व्हेत 18 टक्के पुरुष आणि 17 टक्के महिलांनी देशातील सर्वाधिक आकर्षक पुरुष म्हणून पुतीन यांची निवड केली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुतीन यांना एक टक्का कमी मत पडलं हे ही तितकंच खरे आहे. असं असलं तरी पुतीन यांचं आकर्षण मात्र कमी झालेलं दिसत नाही. कोणताही अभिनेता, खेळाडू आणि नेता पुतीन यांचं आकर्षण कमी करु शकलेला नाही. त्यांचे शर्टलेस फोटो तर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. कित्येकदा ते मासे पकडताना किंवा घोडेस्वारी करताना दिसतात. शर्टलेस फोटोबाबत त्यांना कसलीही चिंता वाटत नाही. (हे वाचा- गर्लफ्रेंडने नशेत असलेल्या बॉयफ्रेंडचा Private Part कापून टॉयलेटमध्ये केला फ्लश ) पुतीन यांच्यानंतर अभिनेता दिमित्री नागियेव यांचा क्रमांक लागतो. त्यानंतर डॅनिला कोजलोव्स्की आणि कॉन्साटंटिन खाबेन्सिकी यांना पसंती देण्यात आली आहे. या सर्व्हेत 300 शहरातील 1000 पुरुष आणि 2000 महिलांना सहभागी करण्यात आलं होतं. पुतिन यांनी रशियाला आर्थिक स्थैर्य दिल्याने त्यांची लोकप्रियता कायम आहे. त्यांनी रशियातील उद्योगांना चालना दिली आणि प्रशासनावरील आपली पकड मजबूत केली. त्यांनी आपली चांगली प्रतिमा तयार करण्यासाठी सुनियोजित राबवलेल्या प्रचारतंत्राचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं. मात्र, दुसरी बाजू रशियातील लोकांना पुतिन यांची भावणारी कामाची पद्धत हेही आहे.