जकार्ता, 14 मे : कोरोनाव्हायरसपासून (Coronavirus) बचावाचा एक मार्ग म्हणजे सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing). मात्र अद्यापही अनेक लोकं याला गांभीर्याने घेत नाही आहेत. सोशल डिस्टन्सिंगचं वारंवार उल्लंघन करत आहेत. त्यामुळे अशा लोकांना आता टॉयलेट साफ करायची शिक्षा दिली जाणार आहे. इंडोनेशियामध्ये (Indonesia) अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. गल्फ न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार, इंडोनेशियातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सोशल डिस्टन्सिंगच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास शिक्षा म्हणून टॉयलेट साफ करावे लागती. सुधारणा व्हावी यासाठी देण्यात आलेल्या शिक्षेपैकी एक शिक्षा आहे. कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखणं हा या शिक्षेमागील उद्देश आहे. अशाच पद्धतीनं मास्क न लावणाऱ्यांना 17 डॉलर्स दंड भरावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं. हे वाचा - कोरोनामुक्त गोव्यात मुंबईहून गेलेल्या प्रवाशांमुळे वाढले रुग्ण इंडोनेशियामध्ये आतापर्यंत 1028 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 15,438 लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे देशात कोरोनाव्हायरसचा धोका अधिक वाढू नये, तो पसरू नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या जात आहेत. मात्र अशा परिस्थितीतही लोकं या नियमांचं वारंवार उल्लंघन करत आहेत. त्यामुळे शिक्षा देण्याबाबत निर्णय घेतले जात आहेत. …तर कोरोना कधीच नष्ट होणार नाही - WHO जागितक आरोग्य संघटनेने (WHO) काही दिवसांपूर्वी लवकरच कोरोनाची लस मिळेल, असे सांगत एक आशेचा किरण दाखवला. मात्र आता WHOने कोरोना कधीच नष्ट होणार नसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. WHOने स्पष्ट केले आहे की, असेही होऊ शकते की कोव्हिड-19 कधीच नष्ट होणार नाही. त्याच्यासोबत जगायची सवय लावून घ्यावी लागेल. हे वाचा - महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये 31 मेपर्यंत वाढवला जाऊ शकतो लॉकडाऊन डब्ल्यूएचओचे आणीबाणीविषयक प्रकरणांचे संचालक मायकेल रायन यांनी बुधवारी जिनिव्हा येथील पत्रकार परिषदेत सांगितले की, “कोरोना व्हायरसमध्ये बदल होऊ शकतो, जो इतरांपेक्षा वेगळा आहे आणि कधीच संपू शकत नाही.” एचआयव्हीचे उदाहरण देत ते म्हणाले की हा व्हायरसही संपलेला नाही आहे. मायकेल रायन यांच्या म्हणण्यानुसार लस नसल्यास सामान्य लोकांना रोगाविषयी योग्य प्रमाणात प्रतिकारशक्ती मिळण्यास अनेक वर्षे लागू शकतात. संकलन,संपादन - प्रिया लाड