नवी दिल्ली, 08 जुलै : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर शुक्रवारी सकाळी जपानच्या नारा शहरात हल्ला झाला. निवडणूक प्रचारादरम्यान अज्ञातांनी त्यांच्यावर दोनदा गोळ्या झाडल्या. त्याच्या प्रकृतीबाबत सध्या वेगवेगळी माहिती समोर येत आहे. जपानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आबे यांना गोळीबारामुळे हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. इतर महत्त्वाचे अवयव काम करत नसल्याचे सांगण्यात आले असून दुसरीकडे, एएफपी या वृत्तसंस्थेने त्यांच्या मृत्यूची शक्यता व्यक्त केली आहे. एका निवडणूक सभेला संबोधित करताना आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यादरम्यान गोळीबाराचा आवाज आला आणि आबे अचानक खाली कोसळले. त्याच्या छातीत कोणीतरी गोळी मारल्याचे प्राथमिक अहवालात दिसून आले आहे. मात्र, त्यांच्यावर मागून दोन वेळा गोळ्या झाडण्यात आल्याचे नंतर स्पष्ट झाले. या गोळीबाराचा व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यामध्ये आबे भाषण करताना दिसत आहेत आणि नंतर गोळीबारामुळे ते खाली कोसळल्याचे दिसत आहे. आबे यांच्यावर नारा मेडिकल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना पाहण्यासाठी पंतप्रधान फुमियो किशिदा पोहोचले आहेत. पोलिसांनी हल्ल्याच्या ठिकाणाहून 42 वर्षीय हल्लेखोराला अटक केली आहे. त्याच्याकडून बंदूक जप्त करण्यात आली आहे. मात्र, हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
हृदयविकाराचा झटकाही आला जपानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोळी लागल्यानंतर आबे यांना हृदयविकाराचा झटका आला. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती आलेले नाही. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळी गोळ्यांचा आवाज ऐकू आला आणि आबे यांच्या शरीरातून रक्त वाहत असल्याचे दिसले. रस्त्यावर होती सभा चालू - जपानमध्ये रविवारी वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आबे तेथे प्रचार करत होते. रस्त्यावर एक छोटासा मेळावा होता, ज्यात 100 हून अधिक लोक उपस्थित होते. आबे भाषण देण्यासाठी आले असता एका हल्लेखोराने मागून गोळीबार केला. ते या व्हिडिओमध्ये दिसत आहे, हल्ल्यानंतर धुराचे लोट दिसत होते. त्यानंतर गदारोळ झाला. हे वाचा - फडणवीसांचे निकटवर्तीय प्रवीण परदेशी सक्रिय, आधी गोवा आता सह्याद्री अतिथीगृहावर हल्ल्यानंतर हल्लेखोराने पळून जाण्याचा प्रयत्न केला शिंजो आबे यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. आबे हे जपानचे सर्वात जास्त काळ दोन टर्ममध्ये जवळपास 9 वर्षे पंतप्रधान राहिले आहेत. 67 वर्षीय शिंजो आबे लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी)शी संबंधित आहेत. आबे 2006 ते 2007 पर्यंत पंतप्रधान होते. यानंतर ते 2012 ते 2020 अशी सलग 8 वर्षे पंतप्रधान होते. त्यांच्या नावावर सर्वाधिक काळ (9 वर्षे) पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम त्यांचे काका इसाकू सैतो यांच्या नावावर होता.