सिडनी, 24 नोव्हेंबर: एका पशुवैद्यक तरुणीनं (Veterinary Surgeon gives horse injection to her friends) नशेच्या गर्तेत आपल्या मित्रांना घोड्यांचं इंजेक्शन दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नशेच्या अधीन झालेली व्यक्ती आपल्याला हवे असलेले नशेचे (Drug addict person) पदार्थ मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. आपण करत असलेली कृती योग्य की अयोग्य याचा कुठलाही विचार न करता टोकाचे निर्णय़ घेतले जातात. अंमली पदार्थांच्या नशेचं व्यसन जडलेल्या एका प्राण्यांच्या (Everyone shocked to know the fact) डॉक्टरनं तिच्या मित्रांसोबत जे केलं, ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. ड्रग्ज घेण्याचा प्लॅन ऑस्ट्रेलियातील पश्चिम भागात राहणारी कॅथरीन मॅग्वेन ही एक पशुवैद्य आहे. विशेषतः घोडा या प्राण्यावर उपचार करण्यात तिचं ट्रेनिंग झालं आहे. मात्र काही दिवसांपूर्वी किरकोळ चुकांमुळे तिला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर मित्रांसोबत ड्रग्ज पार्टीचं आयोजन तिनं केलं होतं. मित्र पार्टी करत असतानाच तीदेखील तिथं दाखल झाली. तिच्यासोबत घोड्यांना देण्याचं इंजेक्शन होतं. माणसांसाठी बंदी असलेलं हे इंजेक्शन तिने मित्रांना दिलं. ही बाब केवळ एंजॉय करा आणि बाहेर याची वाच्यता करू नका, अशी सूचनादेखील तिनं आपल्या मित्रांना दिली होती.
या डॉक्टरची हकालपट्टी करण्यात आली आहे.
काय आहे इंजेक्शन? घोड्यांना आराम पडावा आणि ते शांत व्हावेत, यासाठी केटामाईन ट्रॅक्युलायजर नावाचं इंजेक्शन देण्यात येतं. त्यामुळे घोडे शांत होतात आणि त्यांना झोप लागते. मात्र माणसांना हे इंजेक्शन देणं अपायकारक ठरू शकतं. त्यामुळे ऑस्ट्रेलियात सर्वसामान्य माणसांसाठी हे इंजेक्शन उपलब्धच करून देण्यात येत नाही. मात्र स्वतः जनावरांची डॉक्टर असणाऱ्या कॅथरीनला ते इंजेक्शन मिळत होतं. तिनं या इंजेक्शनचा गैरवापर केला आणि मित्रांना ते टोचून त्यांच्या जीविताला धोका निर्माण केला. हे वाचा - अल्पवयीन बहीण-भावावर तरुण जोडप्याचा बलात्कार; महाराष्ट्राला हादरवणारी घटना तरुणीवर कारवाई सुरू बेकायदेशीरपणे हे इंजेक्शन दिल्यामुळे कॅथरीनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला 2 लाखांपेक्षा अधिक रकमेचा दंड ठोठावण्यात आला असन तिचं लायसन्सही रद्द होण्याची शक्यता आहे.