JOIN US
मराठी बातम्या / विदेश / अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस Corona Positive; 2 बूस्टर डोस घेऊनही लागण

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस Corona Positive; 2 बूस्टर डोस घेऊनही लागण

हॅरिस (57) यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले गेले होते आणि त्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांना बूस्टर डोस मिळाला होता. असं असूनही त्या आता कोरोना संसर्गाशी झुंज देत आहे

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन 27 एप्रिल : अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस (US Vice President Kamala Harris) यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे (Kamala Harris Tests Positive for Coronavirus) . व्हाईट हाऊसने यासंदर्भात माहिती दिली आहे. व्हाईट हाऊसने सांगितलं की रॅपिड आणि पीसीआर दोन्ही चाचण्यांनी हॅरिस यांना संसर्ग झाल्याची पुष्टी केली. मात्र, त्यांच्यात या आजाराची लक्षणं दिसली नाहीत. हॅरिस आपल्या निवासस्थानी विलगीकरणात राहतील परंतु त्या इथून आपली कामं सुरूच ठेवतील आणि संसर्गमुक्त झाल्यानंतरच व्हाईट हाऊसमध्ये परत जातील. हॅरिस (57) यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले गेले होते आणि त्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांना बूस्टर डोस मिळाला होता. असं असूनही त्या आता कोरोना संसर्गाशी झुंज देत आहे. एवढंच नाही तर 1 एप्रिल रोजी त्यांना अतिरिक्त बूस्टर डोसही मिळाला आहे. जगावर अणुयुद्धाची टांगती तलवार! युक्रेनला अमेरिका आणि नाटोकडून शस्त्रे मिळाल्याने रशिया संतापला व्हाईट हाऊसने म्हटलं आहे की अध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन अलीकडच्या काही दिवसांत उपराष्ट्रपती हॅरिस यांच्याशी जवळच्या संपर्कात आले नव्हते. कमला हॅरिस यांचे पती डग इमहॉफ यांना यावर्षी मार्चमध्ये कोरोनाची लागण झाली होती, पण त्यावेळीही कमला हॅरिस निगेटिव्ह आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनाही कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. व्हाईट हाऊसच्या कम्युनिकेशन डायरेक्टर केट बेडिंगफिल्डने या महिन्याच्या सुरुवातीला सांगितलं की त्यांना कोविड पॉझिटिव्ह असल्याचा संशय होता परंतु त्यांचं लसीकरण झालं असून त्यांनी बूस्टर डोसही घेतला होता. गेल्या काही दिवसांत वॉशिंग्टनमधील अनेक प्रभावशाली लोकांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतलं आहे. दुसऱ्यांदा फ्रान्सच्या अध्यक्षपदी बसलेल्या मॅक्रॉन यांच्यासमोर ‘ही’ आहेत मोठी आव्हानं मार्चमध्ये व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन पास्की यांनाही कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय अमेरिकन काँग्रेसच्या नॅन्सी पेलोसी यांनाही कोरोनाची लागण झालेली. अमेरिकेत संसर्गाचा वेग कमी झाल्यानंतर अनेक गोष्टींवरील निर्बंध हटवण्यात आले. अनेक राज्यांमध्ये मास्कची अनिवार्यता रद्द करण्यात आली आहे. कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू अमेरिकेत झाला आहे. न्यूयॉर्क टाइम्सनुसार, 22 एप्रिल रोजी अमेरिकेत कोरोनाचे 12 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले. अमेरिकेत आतापर्यंत सुमारे 9.83 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजही अमेरिकेत कोरोनामुळे दररोज 300 ते 400 लोकांचा मृत्यू होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या