JOIN US
मराठी बातम्या / विदेश / अमेरिकच्या अध्यक्षांचा जिनपिंगना इशारा, रशियाला मदत केलीत तर परिणाम भोगावे लागतील : व्हाईट हाऊस

अमेरिकच्या अध्यक्षांचा जिनपिंगना इशारा, रशियाला मदत केलीत तर परिणाम भोगावे लागतील : व्हाईट हाऊस

“राष्ट्रपती बिडेन यांनी रशियावरील निर्बंधांसह हल्ले रोखण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्याच्या उद्देशानं उपायांविषयी सांगितलं,” असं अधिकारी म्हणाले. युक्रेनवर हल्ला करण्यासाठी चीननं रशियाला मदत केल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात हेही त्यांनी स्पष्ट केलं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन/बीजिंग, 19 मार्च : अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन (US President Joe Biden) यांनी शुक्रवारी त्यांचे चिनी समकक्ष शी जिनपिंग  (china president Xi Jinping) यांना इशारा दिला की, जर चीनने युक्रेनच्या (Ukraine) शहरांवर भयानक हल्ले करण्यासाठी रशियाला मदत करायचं ठरवलं तर त्याचे बीजिंगवर (Beijing) वाईट परिणाम होतील. व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, बिडेन आणि जिनपिंग यांच्यातील 110 मिनिटांचा संवाद हा रशियानं युक्रेनवर (russia ukraine war) केलेल्या हल्ल्यानंतरचं दोन्ही नेत्यांमधलं पहिलंच संभाषण होतं. ही चर्चा प्रामुख्यानं युक्रेनमधील रशियाच्या विशेष लष्करी कारवाईवर आणि अमेरिका-चीन संबंधांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर त्याचे परिणाम यावर केंद्रित होती, असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. “राष्ट्रपती बिडेन यांनी रशियावरील निर्बंधांसह हल्ले रोखण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्याच्या उद्देशानं उपायांविषयी सांगितलं,” असं अधिकारी म्हणाले. युक्रेनवर हल्ला करण्यासाठी चीननं रशियाला मदत केल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात हेही त्यांनी स्पष्ट केलं. तथापि, बिडेन प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं मॉस्कोचा जवळचा मित्र असलेल्या बीजिंगसाठी काय परिणाम होऊ शकतात हे सार्वजनिकपणे सांगण्यास नकार दिला. हे वाचा -  रशियन मिसाईलचा संपला Stock, दारुगोळ्यासाठी आता काय करणार रशिया “मी इथं आमचं धोरण सार्वजनिकपणे शेअर करणार नाही,” असं ते म्हणाले. 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केल्यापासून चीन रशियाचा निषेध करण्याचं टाळत आहे. बिडेन प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले की ही चर्चा अतिशय स्पष्ट होती आणि त्यादरम्यान बिडेन यांनी जिनपिंग यांना पुतीन यांच्या हालचालींबद्दल अमेरिकेच्या दृष्टिकोनाची माहिती दिली. ते म्हणाले की, संभाषणात अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनीही या संकटावर राजनैतिक तोडगा काढण्यासाठी आपला पाठिंबा व्यक्त केला. ते म्हणाले की, अमेरिकेच्या अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली की, रशिया युक्रेनमध्ये जैविक शस्त्रं वापरण्याच्या भीतीबद्दल अपप्रचार करत आहे, याकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये. अधिकाऱ्यानं सांगितले की, जिनपिंग यांनी चर्चेदरम्यान तैवानचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा बिडेन यांनी स्पष्ट केलं की, अमेरिका त्यांच्या एक-चीन धोरणावर ठाम आहे आणि तैवान संबंध कायदा, तीन संयुक्त अधिकृत सूचना आणि सहा आश्वासनांचं पालन करत आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, बिडेन यांनी तैवानच्या आखातामध्ये शांतता आणि स्थिरता राखण्याच्या महत्त्वही अधोरेखित केलं. त्याच वेळी, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक निवेदन जारी करून सांगितलं की, संभाषणात जिनपिंग यांनी स्पष्ट केलं की अमेरिका आणि चीनमध्ये मतभेद आहेत आणि नेहमीच असतील. परंतु, हे मतभेद नियंत्रणात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे वाचा -  पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या खुर्चीवर अंतर्गत बंडाळीची टांगती तलवार निवेदनात जिनपिंग यांचे म्हणणं स्पष्ट करण्यात आलं की, “चीन युक्रेनमधील परिस्थिती या टोकाला जाऊ देऊ इच्छित नाही. चीन शांततेचा समर्थक आहे आणि युद्धाला विरोध करतो. ही भावना चीनच्या इतिहासात आणि संस्कृतीत अंतर्भूत आहे. “संवाद आणि सलोखा गाठण्यासाठी सर्व बाजूंनी रशिया आणि युक्रेनला संयुक्तपणे पाठिंबा द्यावा. ज्यामुळं या प्रदेशात शांतता प्रस्थापित होईल,” असं जिनपिंग म्हणाले. अमेरिका आणि नाटोनेही युक्रेनच्या संकटावर रशियाशी चर्चा केली पाहिजे; जेणेकरून रशिया आणि युक्रेनच्या सुरक्षेची चिंता दूर करता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या