बायडेन यांनी मोदींना दिले खास गिफ्ट
वॉशिंग्टन, 24 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चार दिवसांचा अमेरिका दौरा यशस्वीपणे संपला असून ते दोन दिवसीय इजिप्त दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी खास गिफ्ट दिलं. गुरुवारी झालेल्या युस काँग्रेसच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, होतं की, “गेल्या काही वर्षांपासून एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये खूप प्रगती झालीय. आजचा काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे. पण आज मी तुम्हाला एआयचा नवा अर्थ सांगतो. एआय म्हणजे अमेरिका-इंडिया” पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे विधान छापलेला टीशर्ट बायडेन यांनी दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी भेट म्हणून दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे गिफ्ट आणि त्यावर लिहिलेलं कोटसह ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, एआय भविष्य आहे. मग ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो किंवा अमेरिका-इंडिया. जेव्हा आपण मिळून काम करतो तेव्हा आपले देश आणखी भक्कम होतात आणि जगाची स्थितीही चांगली होते.
PM मोदी 4 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर इजिप्तला रवाना पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआयसह वेगवेगळ्या क्षेत्रातील गुंतवणूक, निर्मिती इत्यादीवर चर्चा करण्यासाठी विविध कंपन्यांच्या सीईओंची भेट घेतली. त्यानंतर मोदींनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस आणि परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांच्यासोबत अधिकृत स्टेट डिनरसाठी उपस्थिती लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दौऱ्याच्या शेवटी बोलताना म्हटलं की, गेल्या नऊ वर्षात भारत आणि अमेरिकेने खूप सुंदर असा प्रवास केला असून सुरक्षा, सागरी क्षेत्रापासून जमीन, आकाश यासह विविध क्षेत्रांमध्ये भक्कम भागिदारी केली आहे. दोन्ही देश सोबतीने विश्वासाने काम करत आहेत. स्वागत करण्यासाठी उपराष्ट्रपती कमला हॅरीस आणि परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांचे आभार.