नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत भारतीय दुतावासाने आठवड्याभरात दुसऱ्यांदा भारतीयांना सूचना केल्या आहेत. बिघडलेली सुरक्षा परिस्थिती आणि नुकतेच झालेले हल्ले पाहता भारतीय दूतावासाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. मागच्या आठवड्यातील बुधवारी (19 ऑक्टोबर) भारतीय दूतावासाने याबाबत सूचना केली होती. दरम्यान काल(दि.25) पुन्हा एक सूचना केली आहे. जे भारतीय नागरिक युक्रेनमध्ये असतील त्यांनी तातडीने युक्रेन सोडावे असा सल्ला दिला आहे. तसेच दूतावासाने युक्रेनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांना लवकरात लवकर युक्रेन सोडण्याचा सल्ला दिला आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या चार भागात मार्शल लॉ लागू करण्याची घोषणा केली. लुहान्स्क, डोनेस्तक, झापोरिझ्झ्या आणि खेरसन, या भागात मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. या भागांवर बेकायदेशीरपणे रशियाच्या ताबा आहे. मार्शल लॉच्या घोषणेनंतर, रशियाच्या सर्व प्रदेशांच्या प्रमुखांना अतिरिक्त आपत्कालीन अधिकार देण्यात आले आहेत.
हे ही वाचा : इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय व्यक्ती बसणार; मॉर्डंट यांची माघार
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे भारतीय दुतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच युक्रेनमधील भारतीय नागरीक हंगरी, सोल्वाकिया, मोल्डोवा, पोलंड आणि रोमानिया सारख्या सीमेवरील देशांच्या मदतीने युक्रेनमधून बाहेर पडू शकता, असेही ही दुतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. याबरोबरच ज्या युक्रेनधील भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी दुतावासाकडून +३८०९३३५५९९५८, +३८०६३५९१७८८१, + ३८०६७८७४५९४५ तीन हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.
व्लादिमीर पुतिन काय म्हणाले?
व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सांगितले की, मी रशियन फेडरेशनच्या या चार भागांमध्ये मार्शल लॉ लागू करण्याच्या हुकुमावर स्वाक्षरी केली आहे. त्यानंतर क्रेमलिनने एक हुकूम प्रकाशित केला की गुरुवारपासून (दि.20) प्रदेशांमध्ये मार्शल लॉ लागू केला जाईल.
हे ही वाचा : भारतच नाही तर या देशांमध्येही निसर्गाचा तांडव! फोटो पाहून उडेल झोप
युक्रेनवरील हल्ले वाढले
रशियाकडून युक्रेनवर हल्ले वाढले आहेत. युक्रेनच्या अनेक शहरांवर ड्रोन हल्ले करण्यात येत आहेत. युक्रेनच्या वतीने ड्रोन हल्ल्यात एका गर्भवती महिलेसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडल्याने पुन्हा युद्ध जोरात पेटण्याची शक्यता आहे. याआधी 10 ऑक्टोबर रोजी रशियाकडून युक्रेनमध्ये सुमारे 84 क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. या हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झाला होता.