JOIN US
मराठी बातम्या / विदेश / रशियानेच Cyber Attack केल्याचे पुरावे, युक्रेनचा दावा; Microsoft ने वर्तवली याहून मोठ्या हल्ल्याची शक्यता

रशियानेच Cyber Attack केल्याचे पुरावे, युक्रेनचा दावा; Microsoft ने वर्तवली याहून मोठ्या हल्ल्याची शक्यता

आपल्यावर रशियानेच सायबर हल्ला केल्याचं सिद्ध होत असल्याचा दावा युक्रेननं केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

किव्ह, 17 जानेवारी: आपल्या देशावर झालेला सायबर हल्ला (Cyber Attack) हा रशियानेच (Russia) केला असल्याचा दावा युक्रेननं (Ukraine) केला असून त्याचे पुरावे (Proofs) आपल्या हाती लागल्याचं म्हटलं आहे. रशियाने ज्या प्रकारे सीमेपाशी सैन्य गोळा केलं आणि देशात अंतर्गत गोंधळाची परिस्थिती तयार करण्यासाठी सायबर हल्ला केला, ते पाहता या हल्ल्यामागे रशियाशिवाय इतर कुणीच असू शकत नाही, असं युक्रेननं म्हटलं आहे. तर अमेरिेकेनंही या सायबर हल्ल्यासाठी रशियावरच संशय व्यक्त केला आहे.   सर्व कारस्थान रशियाचे युक्रेनमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्यात केवळ रशियाचाच फायदा असून दबाव वाढवण्यासाठी रशियाने हे कृत्य केले असल्याचे अनेक पुरावे आतापर्यंतच्या तपासात समोर आल्याचं युक्रेननं म्हटलं आहे. रशियाने आपल्या सीमेजवळ 1 लाख सैन्य आणून उभं केलं आहे आणि दुसरीकडे सायबर हल्ला करून गोंधळ उडवण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावा युक्रेननं केला आहे. मात्र आपल्या नागरिकांचा सर्व वैयक्तिक डेटा सुरक्षित असून घाबरून जाऊ नये, असं आवाहनही युक्रेननं नागरिकांना केलं आहे.   मायक्रोसॉफ्टनं दिला इशारा युक्रेनवर झालेला सध्याचा हल्ला ही केवळ सुरुवात असू शकते. यापेक्षा अधिक भयंकर हल्ले युक्रेनवर होण्याची शक्यता मायक्रोसॉफ्टनं व्यक्त केली आहे. हा हल्ला रँसमवेअरचा नसून मालवेअरचा असल्याचं मायक्रोसॉफ्टनं यापूर्वीच जाहीर केलं होतं. त्यानंतर आता हा नवा इशारा देत सर्व प्रकारच्या सायबर आक्रमणांना युक्रेननं तयार राहण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.   हे वाचा -

काय आहे प्रकरण? युक्रेन आणि युरोपीय देशांची वाढती जवळीक ही रशियासाठी चिंतेचा विषय बनली आहे. युक्रेनला नाटो संघटनेत सभासदत्व मिळू नये, यासाठी रशिया आक्रमक आहे. अमेरिका आणि नाटोनं तसं लेखी आश्वासन आपल्याला द्यावं, अशी मागणी रशियाने केली आहे. आपल्या मागणीसाठी रशियाने दबाव वाढवला असून युक्रेनच्या सीमेवर सैन्यही तैनात करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या