JOIN US
मराठी बातम्या / विदेश / उडत्या तबकड्या म्हणजे काय? 'अमेरिकेत आहेत यासंबंधी व्हिडीओ आणि पुरावे', बराक ओबामांचा दावा

उडत्या तबकड्या म्हणजे काय? 'अमेरिकेत आहेत यासंबंधी व्हिडीओ आणि पुरावे', बराक ओबामांचा दावा

काही गोष्टींचं रहस्य अद्याप कायम आहे, त्यापैकी एक म्हणजे यूएफओ अर्थात उडत्या तबकड्या. Unidentified Flying Object (UFO) असा त्याचा लाँगफॉर्म आहे. या तबकड्यांना अन आयडेंटिफाइड (ओळख नपटलेलं) असं म्हटलं जातं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 मे : माणसाने विज्ञानाच्या आधारे खूप मोठी प्रगती केली असली, तरी अजूनही काही गोष्टींचा छडा त्याला लावता आलेला नाही. ज्या काही गोष्टींचं रहस्य अद्याप कायम आहे, त्यापैकी एक म्हणजे यूएफओ अर्थात उडत्या तबकड्या. Unidentified Flying Object (UFO) असा त्याचा लाँगफॉर्म आहे. या तबकड्यांना अन आयडेंटिफाइड (ओळख नपटलेलं) असं म्हटलं जातं. कारण त्या कोण उडवतं, त्यात कोणी एलियन (Alien) म्हणजे परग्रहावरचा जीव असतो का, त्यांचं नियंत्रण कोण करतं, वगैरे बाबींचं गूढ अद्याप माणसाला उकलता आलेलं नाही. त्या दृष्टीने माणसाचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, महासत्ता असलेल्या आणि विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या अमेरिकेच्या सरकारने यूएफओ बद्दलचे व्हिडिओ किंवा पुरावे असल्याचं आतापर्यंत कायम नाकारलं होतं, मात्र अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी अलीकडेच असा खुलासा केला आहे, की अमेरिकेकडे यूएफओ संदर्भातले काही व्हिडीओज आणि पुरावे आहेत. टीव्ही9 ने दिलेल्या वृत्तानुसार, न्यू मेक्सिको (New Mexico) शहरात रोझवेल येथे 1947 साली एक उडती तबकडी कोसळली होती. त्या वेळी तिथे तैनात असलेले अमेरिकेच्या सैन्यातले माजी अधिकारी वॉल्टर हॉट यांनी एलियन पाहिल्याचा दावा केला होता. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचं मुख्यालय असलेल्या पेंटागॉनने चालू वर्षाच्या सुरुवातीला सांगितलं, की 1947 मध्ये कोसळलेल्या त्या तबकडीच्या अवशेषांची तपासणी सुरू आहे. दरम्यान, बराक ओबामा याच आठवड्यात ‘द लेट लेट शो’ मध्ये आले होते. त्या वेळी त्यांनी उडत्या तबकड्या, एलियन्स, त्यावरचं संशोधन आदींवर भाष्य केलं. ‘मी जेव्हा अध्यक्ष झालो, त्यानंतर मी विचारणा केली होती, की आपण एलियन्स किंवा यूएफओचे अवशेष कोणत्या प्रयोगशाळेत ठेवले आहेत का? त्यावर मला ‘नाही’ असं उत्तर देण्यात आलं होतं, मात्र आकाशात दिसणाऱ्या काही गोष्टींबद्दलचे व्हिडिओज आणि काही रेकॉर्डस् अमेरिकेकडे आहेत. त्या गोष्टी नेमक्या काय आहेत, याबद्दल काहीही माहिती नाही. त्या गोष्टींची हालचाल कशी होते, त्या आकाशात पोहोचल्या कशा, या बाबी सहज समजून घेण्यासारख्या नाहीत. त्यामुळे त्याबद्दल आता अधिक गांभीर्याने संशोधन सुरू झालं आहे,’ असं बराक ओबामा यांनी सांगितलं.

(वाचा -  कोरोना काळात श्रीमंत भारतीयांचा कल परदेशाकडे; ही आहेत कारणं )

ओबामा यांचं हे भाष्य अमेरिका सरकारच्या (US Government) वर्षानुवर्षांच्या भूमिकेशी विसंगत आहे. कारण अशा प्रकारचे काही व्हिडिओज किंवा पुरावे असल्याला अमेरिका सरकार कायमच नकार देत आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पुढच्या महिन्यात काँग्रेसच्या सशस्त्र सेवा समितीकडे याबद्दल एक अहवाल सादर करणार आहेत. त्यामध्ये यूएफओशी संबंधित सगळी माहिती आणि विश्लेषणाचा समावेश असेल. संशोधक अँथनी ब्रगेलिया यांनी या वर्षी सांगितलं, की 1947 च्या घटनेतल्या यूएफओचे अवशेष आणि त्यात दिसलेल्या एलियनला अजूनही कुठे तरी ठेवलेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(वाचा -  OMG! केस आहेत की सोनं? रॉकस्टराच्या 6 केसांच्या लिलावाची किंमत वाचूनच येईल चक्कर )

अमेरिकेच्या नौदलातल्या माजी पायलटनेही अनेकदा यूएफओ पाहिल्याचा दावा केला होता. त्याचे व्हिडिओही एप्रिल महिन्यात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यूएसएस ओमाहा या अमेरिकेच्या जहाजातून यूएफओ दिसत असल्याचं त्या व्हिडिओत दिसत आहे. हे जहाज 2019 साली सॅन दिएगोमध्ये होतं, तेव्हा जहाजाच्या कॅमेऱ्याने हा व्हिडिओ चित्रित केला होता. बराक ओबामांच्या वक्तव्यामुळे या विषयाला पुन्हा एकदा चालना मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या