JOIN US
मराठी बातम्या / विदेश / ट्रान्सजेंडर पुरुषाचं शरीरसंबंधादरम्यान किळसवाणं कृत्य; महिला तणावात, कोर्टाकडून कडक शिक्षा

ट्रान्सजेंडर पुरुषाचं शरीरसंबंधादरम्यान किळसवाणं कृत्य; महिला तणावात, कोर्टाकडून कडक शिक्षा

हा धोकादायक असल्याचं सांगत, कोर्टाने ट्रान्सजेंडर पुरुषाला कडक शिक्षा सुनावली आहे.

जाहिरात

Representative Image

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 जुलै : लंडनमध्ये ट्रान्सजेंडर पुरुषाने दोन महिला आणि एका मुलीसोबत खोट्या लिंगाचा वापर करुन शरीर संबंध ठेवल्याचा प्रकार घडला आहे. कोर्टाने त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 32 वर्षीय तरजीत सिंह याचा जन्म स्त्रीच्या रुपात झाला होता. लहानपणी त्याचं नाव हन्ना वाल्टर्स होतं. मात्र आता त्याची ओळख पुरुषरुपात झाली आहे. सिंह याने शरीरसंबंध ठेवताना प्रोस्थेटिक पेनिसचा वापर केल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंहने एका मुलीसोबत खोट्या लिंगाचा वापर करून शरीर संबंध ठेवले. स्नेरेसब्रुक क्राउन कोर्टात या प्रकरणा सुनावणी झाली. सिंहला संबंधाबरोबर अनेक प्रकरणात दोषी आढळून आला आहे. कोणाला धमकी तर कोणावर हल्ला केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. कोर्ट म्हणालं, हा आरोपी धोकादायक.. न्यायाधीश ऑस्कर डेल फॅब्रो यांनी आपल्या निर्णयात सांगितलं की, सिंह भविष्यात लोकांना त्रास देऊ शकतो. तो एक धोकादायक गुन्हेगार आहे. त्याने तिघींना वारंवार त्रास दिला आणि त्यांच्यावर हल्ला केला. न्यायाधीशांना आपल्या निर्णयात असंही सांगितलं की, सिंहने कधीच मोकळेपणाने आपल्या लैंगिकतेबद्दल सांगितलं नाही. सिंह पुरुष असल्यासारखी वागणूक आणि कपडे घातल होता. या सुनावणीदरम्यान एका पीडितेने आपल्या जबाबात सांगितलं की, या घटनेनंतर मला मानसिक त्रास झाला. यानंतर मला डिप्रेशनची औषधंही घ्यावी लागली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या