प्रेट्र/सिंगापूर, 21 एप्रिल : जगभरात कोरोनाने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत भारताने 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविल्याचे जाहीर केले आहे. तर सिंगापूर (Singapore) या देशाने 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. स्थानिक मीडियाने यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे. सोमवारी सिंगापूरमध्ये कोरोनाने नवे 1426 रुग्ण समोर आले आहेत. त्यापैकी 1410 परदेशी कामगारांच्या डॉरमॅट्रीतील आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने भारतीय कामगार राहतात. सिंगापूरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8000 हून जास्त झाली आहे. दक्षिण पूर्व आशियामधील ही संख्या जास्त आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे. येथे 23 जानेवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर सिंगापूर सरकारने पाऊले उचलत देशाच्या सीमा बंद केल्या. अनेक चाचण्या येथील रहिवाशांसाठी मोफत ठेवण्यात आल्या आहेत. सिंगापूर सरकारने हॉटस्पॉटमधील प्रदेश बंद केला आहे. 4 मेपर्यंत उपाययोजना अधिक कडक केल्या जातील आणि लॉकडाऊन 1 जून पर्यंत वाढविण्यात येत आहे, असे सिंगापूरचे पंतप्रधान Lee Hsien Loong यांनी सांगितले. सध्या कम्युनिटी ससंर्गावर नियंत्रण आणण्यात आले आहे. यापुढे अधिक उपाययोजना केल्या जातील, असंही ते यावेळी म्हणाले. सिंगापूर हे ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय मोठ्या संख्येने भारतीय मजूर तेथे काम करतात. संबंधित - वृद्धाश्रमांची दैनावस्था, लॉकडाऊनमध्ये दान करणाऱ्यांच्या संख्येत झाली मोठी घट कोरोनाला हरवण्यासाठी अमेरिका सज्ज, लस तयार करण्यासाठी केल्या 72 चाचण्या