काबूल, 30 ऑगस्ट: अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) पुन्हा सत्ता काबिज केल्यानंतर बदल झाल्याचा दावा तालिबानकडून (Taliban) सातत्यानं केला जात आहे. मात्र, तालिबानचा हा दावा किती पोकळ आहे, हे सिद्ध करणाऱ्या घटना वारंवार उघड होत आहेत. तालिबानी दहशतवाद्यानी बागलाण प्रांतातील अंदाराबी खोऱ्यात एका गायकाची निर्घृण हत्या (Folk singer murder) केल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. आता त्यानंतर या राजवटीमधील पत्रकारितेचं विदारक चित्र दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाला आहे. अफगाणिस्तानमधील एका न्यूज चॅनलमध्ये तालिबानची एन्ट्री झाल्यानंतरचा हा व्हिडीओ आहे. या न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये एका बाजूला अँकर तर दुसऱ्या बाजूला तालिबानचा कमांडर कारी समीउल्लाह होता. धक्कादायक बाब म्हणजे अँकरच्या मागे तालिबानी दहशतवादी बंदूक घेऊन उभे होते. त्यांच्या गन पॉईंटवरच हा अँकर ही मुलाखत घेत होता. तालिबानी कमांडर ही मुलाखत देत असताना अँकरच्या मागे तीन हत्यारबंद दहशतवादी उभे असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत होतं. पण जेव्हा स्टुडिओचा लाँग शॉट दाखवण्यात आला त्यावेळी त्या स्टुडिओत तीन नाही तर 7 दहशतवादी बंदुका घेऊन अलर्ट मोडवर उभे होते.
तालिबानी कायदे लागू अफगाणिस्तानमध्ये महिलांना समान अधिकार दिला जाईल असं आश्वासन तालिबाननं दिलं होतं. पण त्यांची सत्ता पुन्हा आल्यानंतर अनेक महिलांना नोकरी गमवावी लागली आहे. अफगाणिस्तानच्या सरकारी टीव्ही चॅनलमधील महिला अँकर खादिजा अमीनला बरखास्त करण्यात आलंय. त्यांच्या जागी एका पुरुष तालिबानी अँकरची नियुक्ती करण्यात आली आहे. Exclusive : तालिबानच्या म्होरक्यासोबत NEWS18 ची बातचीत, काय आहे भारताबाबतचं मत? दिली महत्त्वाची उत्तरं हिजाब घालून आणि ओळखपत्र दाखवल्यानंतरही आपल्याला ऑफिसमध्ये प्रवेश दिला जात नसल्याचा दावा अन्य एक महिला अँकर शबनम दावराननं केला आहे. ‘आता तालिबानची राजवट आली आहे, त्यामुळे घरी परत जा’, असं आपल्याला सांगितलं गेल्याची माहितीही शबनमनं दिली आहे.