JOIN US
मराठी बातम्या / विदेश / 18,21,986 रुपये! बराक ओबामांसाठी बनवलेल्या या शूजची होणार या किंमतीला विक्री

18,21,986 रुपये! बराक ओबामांसाठी बनवलेल्या या शूजची होणार या किंमतीला विक्री

Sotheby या वेबसाईटवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी बनवण्यात आलेले हे basketball shoes विक्रीसाठी उपलब्ध असून 25 हजार अमेरिकन डॉलर इतकी किंमत ठेवली आहे. भारतीय चलनामध्ये ही रक्कम 18,21,986 रुपये इतकी होते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 10 फेब्रुवारी: अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या Nike कंपनीच्या शूजची विक्री होणार आहे. कंपनीने केवळ बराक ओबामा (Barack Obama) यांच्यासाठी हे शूज डिझाईन केले होते. यामुळं या सेलमध्ये याला मोठी किंमत मिळण्याची शक्यता आहे. 12.5 साईझच्या आकाराचे हे शूज केवळ एकच जोडी असल्यानं याची किंमत देखील मोठी असणार आहे. Sotheby या वेबसाईटवर हे basketball shoes विक्रीसाठी उपलब्ध असून 25 हजार अमेरिकन डॉलर इतकी किंमत ठेवली आहे. भारतीय चलनामध्ये ही रक्कम 18,21,986 रुपये इतकी होते. Sotheby ने डेडस्टॉक नायके हायपरडंक्स (deadstock Nike Hyperdunks) असं या स्नीकर्सच वर्णन केलं असून 2009 मध्ये बराक ओबामा (Barack Obama) यांच्यासाठी हा शूजचा जोड तयार करण्यात आला होता. यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेला हे शू बराक ओबामा यांनी घातले नसल्याचं देखील Sotheby ने म्हटलं आहे. विक्रीसाठी उपलब्ध असलेले हे शूड याचं सॅम्पल असून मागील 12 वर्षांपासून ते सुस्थितीत ठेवले आहेत.

संबंधित बातम्या

या अमेरिकन शू ब्रँडशी माजी राष्ट्राध्यक्षांचे संबंध खूप जुने आहेत. कॉलेजच्या काळापासून ते या कंपनीचे बूट वापरत आहेत. हवाईच्या पुनाहॉ स्कूल येथील वर्सिटी बास्केटबॉल संघात त्यांनी या कंपनीचे बूट घालून 1979 मध्ये विजेतेपद पटकावलं होतं. ओबामा यांचं Nike या कंपनीशी जुनं नातं असून अनेक राजकीय कॅम्पेनिंगमध्ये या कंपनीने सहभाग नोंदवला होता. शिकागो येथील ओबामा प्रेसिडेंशियल सेंटरमध्ये फिजिकल अॅक्टिव्हिटींना चालना देणाऱ्या एका सार्वजनिक जागेच्या निर्मितीसाठी 2020 मध्ये कंपनीने ओबामा फाऊंडेशनला 5 मिलियन डॉलरची देणगी दिली होती. (हे वाचा- सिनेरसिकांची निराशा, भारतीय सिनेमा ‘जल्लीकट्टू’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर) बराक ओबामा (Barack Obama) यांना बास्केटबॉल (Basketball) खेळायला आवडतं, हे सर्वांना माहित आहे. यामुळं त्यांच्यासाठी बूट तयार करणं कंपनीसाठी नवीन गोष्ट नाही. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेन खेळाडूंनी हे खास हायपरडंक्स बूट घातले होते. युनायटेड वे राइज या संकल्पनेवर आधारित हे बूट तयार करण्यात आले होते. युनायटेड वे राइज (United We Rise) या संकल्पनेवर आधारित हा बूट पांढर्‍या लेदर अपर, ब्लू नायके ट्रेडमार्क स्वीश आणि दृश्यमान फ्लायवायर तंत्रज्ञानासह विक्रीसाठी उपलब्ध आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या लोगोसह यावर 1776 या अमेरिकेच्या शोध दिवसाचा देखील समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या