मुंबई, 16 जानेवारी: ड्रिंकचे काही जण इतके शौकीन असतात ते त्याकरता कितीही पैसे मोजण्यासाठी तयार होतात. पण या व्यक्तीने खर्च केलेले पैसे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. थोडेथोडके नव्हे या पठ्ठ्याने 4 कोटी रुपयांची Whiskey खरेदी केली आहे. इस्तंबूल विमानतळावरील ड्युटी फ्री स्टोअरमधून सिंगल माल्ट जपानी व्हिस्कीची (single malt Japanese whiskey) दुर्मिळ बाटली 4.14 कोटी रुपयांना विकली गेली आहे. ही दुर्मिळ व्हिस्कीची बाटली विकत घेणारा एक चिनी प्रवासी आहे. यामाझाकी नावाची ही 55 वर्ष जुनी व्हिस्की गेल्या महिन्यापासून (December 2021) विमानतळाच्या युनिफ्री ड्युटी फ्री आउटलेटवर (Unifree Duty Free) विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलच्या एअरपोर्ट वर्ल्ड (Airport World) या मासिकातून ही माहिती मिळाली आहे. हे वाचा- वयाच्या दहाव्या वर्षी करोडपती, दोन कंपन्यांची मालकीन; नेमकं काय करते ‘ही’ मुलगी? या बॉटलवर बोली लावण्यासाठी ग्राहकांना आमंत्रित करण्यात आले होते. आठ ग्राहकांनी याकरता वैध ऑफर दिली होती, अखेर ही बॉटल चिनी ग्राहकाने जिंकली आहे. यूनिफ्री ड्यूटी फ्री (Unifree Duty Free) चे सीईओ CEO अली सेनर (Ali Senher) यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, आम्हाला आनंद आहे की ही रेकॉर्ड ब्रेक विक्री आमच्या स्टोअरवर झाली आहे. ते म्हणाले की, या विक्रीमुळे हे माहित होते की रिटेल सेक्टरसाठी स्पेशल प्रोडक्ट अधिक चांगले परिणाम साध्य करण्यात मदत करू शकतात. इस्तंबुल विमानतळ हे ग्राहकांसाठी उत्तम ठिकाण आहे. हे वाचा- काय सांगता? जपानमधील `ही` व्यक्ती भाडेतत्त्वावर होते उपलब्ध जाणून घ्या व्हिस्कीविषयी.. हाऊस ऑफ सनटोरीच्या इतिहासातील ही सर्वात जुनी सिंगल माल्ट व्हिस्की आहे. ही सनटोरीचे (House of Suntory) संस्थापक शिंजिरो तोरी यांच्या देखरेखीखाली 1960 मध्ये बनवण्यात आली होती. 2020 मध्ये जपानमध्ये याच्या 100 बाटल्या लॉटरी पद्धतीने जारी करण्यात आल्या होत्या. यानंतर जपानमध्ये 2021 मध्ये त्याच्या रीलीजबाबत विस्तार करण्यात आला. उर्वरित जगासाठी 100 बाटल्यांची मर्यादित ऑफर देखील सादर करण्यात आली.