JOIN US
मराठी बातम्या / विदेश / कॅनडात 21 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची गोळी घालून हत्या; जानेवारी महिन्यातचं...

कॅनडात 21 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची गोळी घालून हत्या; जानेवारी महिन्यातचं...

या घटनेनंतर परराष्ट्र मंत्र्यांनीन ट्विट करून संताप व्यक्त केला…

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 9 एप्रिल : कॅनडामधील टोरंटोमधून (Toronto of Canada) एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. गुरुवारी एका रेल्वे स्टेशनबाहेर झालेल्या गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मृत तरुणाचं नाव कार्तिक वासुदेव (21) असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर(External Affairs Minister S. Jaishankar) यांनी tweet करून विद्यार्थ्याच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केलं. हत्या कोणत्या हेतून करण्यात आली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. कार्तिक गाजियाबाद येथील राहणारा होता. कार्तिकचे कोणासोबत शत्रुत्व होते याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. कार्तिक अभ्यासासह मॅक्सिकन रेस्टॉरंटमध्ये पार्ट टाइम जॉब करीत होता. या नातेवाईकाला इंटरनेटच्या माध्यमातून याबाबत माहिती मिळाली. कार्तिकने गाजियाबादमधील डीएव्ही शाळेतून शिक्षण घेतलं होतं. दहावीनंतर कार्तिकला कॅनला जायची इच्छा होती. कार्तिकच्या कुटुंबात आई-वडील आणि एक लहान भाऊ आहे. हे ही वाचा- कॅमेऱ्यासमोर उभं राहून महागड्या बॅगांचे तुकडे का करतायेत रशियन तरुणी? जाणून घ्या कामावर जात होता तरुण… सायंकाळी साधारण 5 वाजता रेल्वे स्टेशनबाहेर गोळीबार झाला. यावेळी कार्तिक कामावर जाण्यासाठी निघाला होता. ही घटना सेंट जेम्स टाउन स्थित शेरबॉर्न सबवे स्टेशनच्या ग्लेन रोड गेट येथील आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतर ऑफ-ड्यूटी पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. यानंतर त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही.

संबंधित बातम्या

एका तरुणावर संशय.. पोलिसांनी साधारण 5 फूट 6 इंचाच्या एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला. तो ग्लेन रोडवर एका हँडगनसह दिसला होता. पोलीस आजूबाजूच्या कॅमेऱ्यांच्या मदतीने हल्लेखोरांचा तपास करीत आहे. कार्तिकच्या भावाने कॅनडाच्या एका न्यूज चॅनलला सांगितलं की, टोरंटोच्या सेनेका कॉलेजमध्ये कार्तिक मार्केटिंग मॅनेजमेंटचं शिक्षण घेत होता. जानेवारी महिन्यात कार्तिक कॅनडाला आला होता. यावेळी कोणी व्हिडीओ शूट केला आहे का, याचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या