वॉशिंग्टन, 11 एप्रिल : कोरोनामुळे साऱ्या जगात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. जगातील एकूण मृतांची संख्या 1 लाखांहून अधिक झाली आहे. वैद्यकिय कर्मचारी दिवसरात्र कोरोनाविरुद्धच्या लढ्यात रुग्णांची सेवा करत आहेत. काही कर्मचारी तर कित्येक दिवस घरी गेले नाही आहेत. आपल्या मुलांचे तोंडही त्यांना पाहता येत नाही आहे. अशीच एक घटना अमेरिकेत पाहायला मिळाली. 28 वर्षीय केल्सी केर अमेरिकेच्या ओहायो येथे परिचारिका आहेत. कोरोना संकटात कर्तव्यामुळे त्या जवळपास एक महिना घरापासून दूर होत्या. 9 एप्रिल रोजी त्या घरी परतल्या, तेव्हा आपल्या लेकीला पाहून आईचा ऊर भरून आला. कोरोनामुळे केल्सी सध्या शासकिय रुग्णालयात काम करत आहे. कोरोनाची लढ्यात त्या महत्त्वाची भुमिका बजावत आहे. त्यामुळं तब्बल महिन्याभरानंतर घरी परतलेल्या आपल्या लेकीला पाहून आईला अश्रू अनावर झाले. केल्सी यांनी आई चेरिल नॉर्टन या प्रथम आपल्या मुलीकडे पाहत राहिल्या. त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्यानंतर त्यांनी स्वत:ला चादरीत गुंडाळून मुलीला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागल्या. वाचा- कोरोनाशी लढण्यासाठी रस्त्यावर उतरले चक्क ‘यमराज’, घरातून बाहेर पडाल तर… वाचा- पनवेलमध्ये भाजप नगरसेवकाने केलं जंगी बर्थडे सेलिब्रेशन, पोलिसांनी 11 जणांना अटक मुलीला मिठीत घ्यायचं होतं पण… तब्बल एका महिन्यांनंतर या माय-लेकीची भेट झाली. चेरिल यांनी याबाबत, " मला माहितही नव्हतं माझी मुलगी कशी आहे. तिला पाहून मला एक क्षण कळलंच नाही काय करू. म्हणून मी स्वत:ला चादरीत गुंडाळून घेतलं आणि तिला मिठी मारली. मी सोशल मीडियावर पाहिलं की बर्याच आरोग्य कर्मचाऱ्यांना आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. माझ्या मुलीच्या बाबतीतही असे व्हावे असे मला वाटत नव्हते", असे सांगितले. वाचा- कोरोनाबाबत जनजागृतीसाठी पोलिसांचा रुट मार्च, लोकांनी अभिमानाने वाजवल्या टाळ्या आयुष्यातला सर्वात कठिण काळ-केल्सी एका महिन्यांनंतर घरी परतलेल्या केल्सीने, ‘मी घरी सामना पाठवायचे. पण घरी जाण्यासाठी जीव तळमळत होता. आईला पाहायचे होते. घरी परतल्यानंतर आईची ही मिठी माझ्यासाठी खास आहे. आयुष्यातल्या सर्वात कठिण प्रसंगी आई माझ्यासोबत आहे", असे सांगितले. या माय लेकीचा अलिंगणाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- लाडक्या लेकीसह ON POLICE DUTY, महिला पोलीस देतेय कोरोनाशी लढा!