JOIN US
मराठी बातम्या / विदेश / सौदी अरेबियात ट्रेन ड्रायव्हरच्या 30 जागांसाठी 28000 महिलांचे अर्ज; पहिल्यांदाच मिळतेय अशी संधी

सौदी अरेबियात ट्रेन ड्रायव्हरच्या 30 जागांसाठी 28000 महिलांचे अर्ज; पहिल्यांदाच मिळतेय अशी संधी

सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia Jobs) पहिल्यांदाच महिलांना रेल्वे ड्रायव्हर (Railway Driver Jobs) म्हणून नोकरीची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी एका रेल्वे कंपनीनं (Railway Company) जाहिरात दिली असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मदिना, 18 फेब्रुवारी: आजही अनेक देशांमध्ये महिलांना पुरुषांच्या तुलनेत दुय्यम स्थान आहे. स्त्रीनं घरात राहून चूल आणि मूल सांभाळण्याचेच काम केलं पाहिजे. अशी समाजधारणा आहे. स्त्रियांना स्वतंत्र व्यक्ती, माणूस म्हणून जगण्याचा हक्क फार कमी मिळतो. स्त्रियांवर आजही राहणीमान, खाणं-पिणं, निर्णय स्वातंत्र्य, आर्थिक स्वावलंबन याबाबतीत अनेक बंधने आहेत. विशेषत: सौदी अरेबियासारख्या पुराणमतवादी मुस्लिम देशांमध्ये (Muslim Countries) तर अगदी अलीकडच्या काळापर्यंत महिलांवर अनेक बंधने होती. आता बदलाचे वारे या मुस्लीम देशांमध्येदेखील पोहोचले असून, महिलांवरील अनेक बंधनं शिथिल केली जात आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये त्यांना संधी दिली जात आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia Jobs) पहिल्यांदाच महिलांना रेल्वे ड्रायव्हर (Railway Driver Jobs) म्हणून नोकरीची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी एका रेल्वे कंपनीनं (Railway Company) जाहिरात दिली असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. रेल्वे ड्रायव्हरच्या (Train Driver jobs for women) 30 जागांसाठी तब्बल 28,000 अर्ज प्राप्त झाले आहेत. बीबीसीने याबाबत वृत्त दिले आहे. हे वाचा- तंत्रज्ञानाची कमाल आणि HIV च्या आजारातून झाली सुटका, वाचा सविस्तर स्पॅनिश रेल्वे कंपनी (Spanish railway Company) रेन्फेने (Renefe) ही कर्मचारी भरती मोहिम आखली आहे. या रेल्वे कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, या पदासाठी निवड केलेल्या महिला उमेदवारांना एक वर्षाचं प्रशिक्षण दिलं जाणार असून, मक्का (Makka) आणि मदिना (Madina) या पवित्र शहरांदरम्यान हाय-स्पीड ट्रेनच्या ड्रायव्हर (Hi Speed Train Driver) म्हणून त्या काम करतील. पहिल्यांदाच अशी संधी मिळाल्यानं इथल्या महिलांनी या जाहिरातीला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. गेल्या अनेक दशकांपासून सौदी अरेबियामध्ये सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे (Women Employees) प्रमाण जगात सर्वात कमी होते. अलीकडच्या काही वर्षात यात बदल होत आहे. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वाखाली इथल्या सरकारने यासाठी पुढाकार घेतला आहे. आपल्या देशाची फक्त तेलावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था बदलण्यासाठी, त्यात विविधता आणण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून त्यांनी कामकाजात महिलांची संख्या वाढवण्याच्यादृष्टीनं पावलं उचलली आहेत. यासाठी महिलांना वाहन चालवण्याची परवानगी देणे, महिलांना मुक्तपणे प्रवास करण्याची मुभा देण्यासाठी पुरुष पालकत्व कायदे शिथिल करणे यासह अनेक सामाजिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. अशा बदलांचा परिणाम म्हणून, गेल्या पाच वर्षांमध्ये महिलांचा सहभाग जवळजवळ दुप्पट होऊन 33 टक्के झाला आहे. गेल्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत पुरुषांपेक्षा अधिक महिलांनी नोकरी पेशात प्रवेश केला आहे. हे वाचा- सुवर्णसंधी! DRDO मध्ये डिग्री आणि डिप्लोमा धारकांसाठी मोठी भरती; इथे करा अर्ज अर्थात अद्यापही सार्वजनिक क्षेत्रातील बहुतेक नोकऱ्या पुरुषांकडेच असल्याचा निष्कर्ष अमेरिकेतील थिंक टँक ब्रूकिंग्स इन्स्टिट्यूटने गेल्या वर्षी प्रकाशित केलेल्या अभ्यास अहवालात मांडण्यात आला आहे. त्यामुळं या रेल्वे कंपनीच्या संधीमुळे महिलांना एका नव्या आव्हानात्मक क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध झाली असली तरी काम करू इच्छिणाऱ्या फार कमी महिलांना याचा लाभ मिळणार आहे. सौदी अरेबियासारख्या देशात महिलांना अनेक सवलती मिळत असल्या तरी अद्याप लग्न करण्यासाठी, तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी किंवा विशिष्ट आरोग्य सेवा मिळविण्यासाठी पुरुष पालकाची मान्यता घेणे अनिवार्य आहे. आजही महिलांना लग्न, कुटुंब, घटस्फोट आणि मुलांशी संबंधित निर्णयांमध्ये भेदभावाचा सामना करावा लागतो. ही विषमता आजही महिलांच्या सक्षमीकरणात मोठा अडथळा असल्याचं मानवाधिकार कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सौदी अरेबियासारख्या देशातील महिलांसाठी हा बदलदेखील खूप महत्त्वाचा आहे. भविष्यात तिथलं चित्र अजून बदलेलं दिसेल अशी चिन्हे आता दिसत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या