कीव, 24 फेब्रुवारी: रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची (Russia Military Operation in Ukraine) घोषणा केली आहे. आतापर्यंत राजधानी कीवसह अनेक शहरांमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावर याबाबत अनेक व्हिडीओ देखील शेअर केले जात आहेत. रशियाने अनेक ठिकाणी क्रूझ आणि बॅलेस्टिक मिसाईलने हल्ले केले आहेत. दरम्यान, युक्रेनच्या एका महिलेने धक्कादायक दावा केला आहे. युक्रेनियन महिलेचा दावा आहे की रशियन सैनिक तिला टिंडरवर फ्लर्टी मेसेज पाठवत (flirty messages) आहेत. द सनच्या वृत्तानुसार, आंद्रेई, अलेक्झांडर, ग्रेगरी आणि मायकेल यांच्यासह डझनभर रशियन सैनिकांनी युक्रेनमधील महिलांना आकर्षित करण्यासाठी टिंडर या डेटिंग अॅपवर प्रोफाइल तयार केली आहेत. दशा सिनेलनिकोवा (Dasha Synelnikova) नावाच्या महिलेने सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून अनेक रशियन सैनिक तिला टिंडरवर मेसेज आणि रिक्वेस्ट पाठवत आहेत. 33 वर्षीय दशा सिनेलनिकोवा हिने ‘द सन’ला सांगितले की, ‘मी युक्रेनमधील कीव (Kyiv) येथे राहते. परंतु एका मित्राने मला सांगितले, की टिंडरवर बरेच रशियन सैनिक आले आहेत. म्हणून मी माझे लोकेशन बदलून खार्किव (Kharkiv) केले आहे. परंतु तिथेही मला रशियन सैनिकांचे मेसेज येऊ लागले. हे वाचा-
अखेर रशियाने युक्रेनवर हल्ला का केला? या महत्त्वाच्या मुद्द्यांमधून घ्या जाणून स्क्रीनशॉट शेअर करत महिलेने दावा केला आहे की, रशियन सैनिक तिला फ्लर्ट करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर मेसेज पाठवत आहेत. अनेक सैनिकांनी त्यांच्या पोझिशनची माहिती त्यांच्या फोटोंसह महिलांनाही पाठवली आहे. दशा सिनेलनिकोवा 31 वर्षीय आंद्रेईसोबत (कथित रशियन सैनिक) मेसेजवर बोलली. दशाने आंद्रेईला विचारले तू कुठे आहेस? तू खार्किवमध्ये आहे का? यावर आंद्रेई म्हणाला- ‘अर्थात मी खार्किवमध्ये नाही, पण मी जवळच आहे. तिथून फक्त 80 किमी दूर आहे.’ हे वाचा-
रिपोर्टिंग दरम्यान आला रशियाच्या Fighter Jet चा भयंकर आवाज, पाहा LIVE VIDEO दशाने पुन्हा विचारले- ‘मला भेटण्याचा तुमचा काही विचार आहे का?’, यावर आंद्रेईने उत्तर दिले- ‘मी आनंदाने तुला भेटायला येईन. पण 2014 पासून युक्रेनने (Ukraine) रशियन लोकांचे स्वागत केले नाही.’ यावर दशाने पुन्हा विचारले- ‘तू काय करतोस?’ यावर आंद्रेईने कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही.
महिलेने टिंडरचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे
दशा पुढे म्हणाली की, ‘पाठवलेल्या फोटोत एक रशियन सैनिक घट्ट पट्टेदार बनियानमध्ये दिसत होता. दुसऱ्या एका फोटोत एक माणूस बेडवर पिस्तुल घेऊन पडला होता. मला त्यांच्यापैकी एकही आकर्षक वाटला नाही. मी कधीही शत्रू सोबत बोलण्याचा विचार करणार नाही. मी टिंडरवर त्याची रिक्वेस्ट नाकारली आहे. पण अनेकांनी मला असे मेसेज पाठवले आहेत.’