JOIN US
मराठी बातम्या / विदेश / रशिया-युक्रेन युद्धात सैनिकाच्या छातीत घुसला बॉम्ब; पुढं जे घडलं ते चकित करणारं

रशिया-युक्रेन युद्धात सैनिकाच्या छातीत घुसला बॉम्ब; पुढं जे घडलं ते चकित करणारं

छातीतून एक जिवंत बॉम्ब शरीरात घुसला होता. बॉम्ब त्यांच्या बरगड्या आणि फुफ्फुसांच्या पार जाऊन पाठीच्या कण्यापर्यंत पोहोचला आणि हृदयाच्या अगदी जवळ शिरला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कीव 11 नोव्हेंबर : रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरू आहे. 9 महिन्यांपासून सुरू असलेलं हे युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही. दोन्ही देश शांततेच्या मार्गावर चालण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात दोन्ही देशांमधील सैनिक आणि नागरिकांचा जीव जात आहे. दरम्यान, युद्धाशी संबंधित अनेक भयंकर घटना आणि कथा समोर येत आहेत. अनेक घटना हादरवून टाकणाऱ्या आहेत. अलीकडेच एका रशियन सैनिकाशी संबंधित बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये एका सैनिकाच्या शरीरात जिवंत बॉम्ब घुसला, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर तो बॉम्ब काढण्यात आला. मोठी बातमी! मेक्सिकोमध्ये झालेल्या गोळीबारात तब्बल 9 जणांचा मृत्यू, तर 2 जखमी डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, निकोलाय पॅसेन्को हे रशियन सैन्यातील ज्युनिअर सार्जंट असून ते युक्रेनमध्ये तैनात आहेत. युद्धादरम्यान ते गंभीर जखमी झाले. 10 नोव्हेंबर रोजी रशियन संरक्षण मंत्रालयाने त्यांच्या दुखापतीची पुष्टी केली आणि त्यांना काय झालंय हे सांगितलं. रिपोर्टनुसार, त्यांच्या छातीतून एक जिवंत बॉम्ब शरीरात घुसला होता. बॉम्ब त्यांच्या बरगड्या आणि फुफ्फुसांच्या पार जाऊन पाठीच्या कण्यापर्यंत पोहोचला आणि हृदयाच्या अगदी जवळ शिरला होता. रशियन न्यूज एजन्सी तासने दिलेल्या माहितीनुसार, पॅसेन्को यांना तात्काळ सेंट्रल मिलिटरी डिस्ट्रिक्टमधील मँड्रिक सेंट्रल मिलिटरी क्लिनिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ऑपरेशन दरम्यान शरीरात कधीही बॉम्बचा स्फोट होऊ शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. अशा परिस्थितीत त्यांचं ऑपरेशन करणं खूप आव्हानात्मक होतं. त्यामुळे डॉक्टरांनी चक्क बॉम्ब प्रूफ जॅकेट घालून हे ऑपरेशन केलं. त्यांनी त्यांच्या मेडिकल गाऊनखाली बॉम्ब प्रूफ जॅकेट घातलं व ही अवघड सर्जरी यशस्वीपणे पूर्ण केली. मालदीवमध्ये मोठी दुर्घटना; 9 भारतीयांसह 10 जणांचा होरपळून मृत्यू यशस्वी झालं ऑपरेशन ज्या खोलीत या सैनिकाला आणून ठेवलं होतं, त्याच खोलीत डॉक्टरांना हे ऑपरेशन करावं लागलं. कारण त्याला तिथून दुसरीकडे हलवणंदेखील धोकादायक होतं. ही सर्जरी यशस्वी झाली असून, आता या सैनिकाला मॉस्को येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ऑपरेशननंतर लगेच त्या सैनिकाने स्थानिक माध्यमांशीही संवाद साधला. “माझ्यामुळे डॉक्टरांना त्रास होऊ नये, त्यांच्यासोबत वाईट घडू नये, असं मला वाटत होतं. त्यांनी धाडस दाखवलं आणि बॉडी आर्मर घालून हे ऑपरेशन केलं. त्यांच्यामुळेच आज मी जिवंत आहे," असं त्या सैनिकाने सांगितलं. डॉक्टरांनी दाखवलेल्या हिमतीमुळे जिवंत बॉम्ब शरीरात घुसलेल्या त्या सैनिकाचा जीव बचावला. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर डॉक्टरांचं कौतुक होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या