पुतिन यांची मोठी घोषणा; युक्रेनमधील दोन प्रांतांना स्वतंत्र राष्ट्राची मान्यता, रशियाच्या निर्णयाने खळबळ
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला तणाव आता आणखी वाढताना दिसत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशाला संबोधित करताना एक मोठी घोषणा केली आहे. पुतिन यांनी रशियाला संबोधित करताना पूर्व युक्रेनमधील दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी केलेल्या या घोषणेमुळे आता तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. पूर्व युक्रेनमधील डोनेत्सक (Donetsk) आणि लुगंस्क (Lugansk) यांना स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता दिली आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनेत्सक पीपल्स रिपब्लिक (डीपीआर) आणि लुगांस्क पीपल्स रिपब्लिक (एलपीआर)च्या मान्यतेशी संबंधित कार्यकारी आदेशावरही स्वाक्षरी केली आहे. रशिया आणि डीपीआर, एलपीआर यांच्यातील हा करार मैत्री, सहकार्य आणि परस्पर सहाय्य याबद्दल आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, रशियन राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, ज्यांनी हिंसाचार, रक्तपात, अराजकतेचा मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली त्यांनी डॉनबासचा मुद्दा ओळखला नाही. डोनेत्सक पीपल्स रिपब्लिक आणि लुगांस्क पीपल्स रिपब्लिकचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व ओळखा. पुतिन यांनी केलेल्या या घोषणेनंतर युक्रेनच्या या भागात रशियन सैन्य पाठवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाचा : समुद्रात मस्ती करत होते लोक; इतक्यात अचानक पाण्यात कोसळलं हेलिकॉप्टर, LIVE VIDEO रशियाने घेतलेल्या या निर्णयानंतर एकच खळबळ उडाली आहे. फ्रान्स, अमेरिका, जर्मनी यांच्याकडून रशियाला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. रशियाच्या या भूमिकेनंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने आपत्कालीन बैठकीचं आयोजन केलं आहे. भारत सरकार सुद्धा या बैठकीत आपली भूमिका मांडणार आहे.
या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत चर्चा होणार आहे. अल्बानिया, आयर्लंड, नॉर्वे आणि मेस्किकोसह 15 देशांनी बैठक बोलावण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. वाचा : रशिया-युक्रेनच्या वादात भारताचं सावध पाऊल, सरकारनं घेतला मोठा निर्णय रशियाच्या निर्णयानंतर बायडेन काय घेणार निर्णय? रशियाच्या या निर्णयावर अमेरिकेने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले की, अध्यक्ष जो बायडेन लवकरच अमेरिकन नागरिकांना लुहांस्क आणि डोनेस्तक प्रदेशात गुंतवणूक करण्यापासून रोखणारे आदेश जारी करतील. अमेरिकेशिवाय ब्रिटन आणि इतर देशांकडूनही निर्बंध लावण्याची चर्चा असल्याचं बोललं जात आहे.