JOIN US
मराठी बातम्या / विदेश / ट्रक आणि पिकअप व्हॅनची जोरदार धडक, 13 जणांनी गमावला जीव

ट्रक आणि पिकअप व्हॅनची जोरदार धडक, 13 जणांनी गमावला जीव

20-22 बांधकाम मजुरांसह पिकअप व्हॅन ताजपूरकडे निघाली होती. अपघातानंतर सिलहट-ढाका महामार्गावर तीन तास वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती.

जाहिरात

बांग्लादेश अपघात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ढाका : पिकअप व्हॅन आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 13 जणांनी जीव गमवला आहे. हा अपघांत खूप भयंकर होता. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. ढाका राजमार्गावर बुधवारी नजीर मार्केट परिसरात ट्रकने पिकअप व्हॅनला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये 8 जण जखमी झाले आहेत. 8 मृतदेहांची ओळख पटली असून अद्याप चार जणांची ओळख पटणे बाकी आहे. याबाबत पोलिसांनी एक पत्रक जारी केलं आहे. दक्षिण सुरमा पोलिसांचे प्रभारी एमडी समसुद्दोहा यांनी सांगितले की, कुतुबपूर भागात बांधकाम मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅनवर वाळूने भरलेला ट्रक आज पहाटे साडेपाचच्या सुमारास धडकला, या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आणि 10 जखमी झाले. स्टेशन जखमींना सिल्हेट उस्मानी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. 20-22 बांधकाम मजुरांसह पिकअप व्हॅन ताजपूरकडे निघाली होती. अपघातानंतर सिलहट-ढाका महामार्गावर तीन तास वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती. अपघातानंतर महामार्गावर बराच वेळ जाम झाला होता. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर सकाळी आठच्या सुमारास वाहनांची वाहतूक पुन्हा सुरू झाली

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या