JOIN US
मराठी बातम्या / विदेश / अरे देवा! कोरोनानंतर आता आणखी एक संकट, उंदरांमार्फत माणसांमध्ये पसरतोय व्हायरस

अरे देवा! कोरोनानंतर आता आणखी एक संकट, उंदरांमार्फत माणसांमध्ये पसरतोय व्हायरस

सामान्यपणे उंदरांमध्ये आढळणारा Virus आता माणसांमध्ये पसरू लागला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हाँगकाँग, 12 मे : एकिकडे कोरोनाव्हायरस (coronavirus) जगभरात थैमान घालतो आहे, हा व्हायरस वटवाघळातून आल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. तर आता दुसरीकडे उंदरांमार्फत (rats) धोकादायक व्हायरस पसरू लागला आहे. हाँगकाँगमध्ये (Hongkong) हिपेटायटिस ई व्हायरसची (HEV) प्रकरणं समोर आली आहेत. सामान्यपणे उंदरांमध्ये आढळणारा हा व्हायरस आता माणसांमध्ये पसरू लागला आहे. हाँगकाँगच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, माणसांमध्ये रॅट हेपेटायटिस ई व्हायरसच्या संक्रमणाची प्रकरणं समोर आलीत. हा व्हायरस फक्त उंदरांनाच संक्रमित करू शकतो, मात्र आता माणसंही या व्हायरसमुळे आजारी पडू लागलीत. हेपेटायटिस ई चा नवा स्ट्रेन इतक्या वेगानं माणसांना आजारी पाडत आहे. आतापर्यंत 11 लोकं या व्हायरसचे शिकार झालेत. मात्र त्यांना या व्हायरसची लागण नेमकी झाली कशी हे अद्याप समजलेलं नाही त्यामुळे डॉक्टरही हैराण झालेत. हे वाचा -  माजी मुख्यमंत्र्यांची प्रकृती गंभीर, आता गाणी ऐकवून दिली जात आहे ऑडिओ थेरेपी 2018 साली रॅट हेपेटायटिस ई व्हायरस संक्रमणाचं पहिलं प्रकरण हाँगकाँगमध्ये समोर आलं होतं. तर कॅनडात 2019 साली एका व्यक्तीला या व्हायरसची लागण झाली होती, ही व्यक्ती आफ्रिकेवरून प्रवास करून परतली होती. सीएनएन च्या मते, हाँगकाँगमध्ये 30 एप्रिलला या संक्रमणाचं पहिलं प्रकरण समोर आलं आहे आणि आतापर्यंत 11 जणांना याची लागण झाली आहे. 30 एप्रिलला हाँगकाँगच्या क्वीन मेरी हॉस्पिटलमध्ये 61 वर्षीय रुग्णाला या व्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं. या रुग्णानं कुठंही प्रवास केला नव्हता, शिवाय त्याच्या घरातही उंदीर नव्हतं. इतकंच नव्हे तर ज्या व्यक्तींच्या संपर्कात तो आला त्यांच्यातही या व्हायरसची लक्षणं नाहीत. या रुग्णाला लिव्हरची समस्या होती, त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हा रुग्णाला HEV कसा झाला हे अद्याप डॉक्टरांना समजलेलं नाही. हे वाचा -  अंगावर थुंकला होता कोरोनाग्रस्त प्रवासी, रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू हाँगकाँग युनिव्हर्सिटीतील मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. सिद्धार्थ श्रीधर यांनी सीएनएनला सांगितलं, हाँगकाँगममधील उंदरांमध्ये हा व्हायरस असतो आणि जेव्हा माणसांची चाचणी करण्यात आली, त्यांच्यातही हा व्हायरस सापडला. हा व्हायरस मानवी शरीरात पोहोचला कसा, हा प्रश्न आहे. उंदराने उष्टे केलेल अन्नपदार्थ, इतर प्राणी की आणखी कोणत्या कारणांमुळे या व्हायरसचं संक्रमण झाला याबाबत माहिती मिळालेली नाही. डॉक्टरांच्या मते, HEV च्या संक्रमणानंतर रुग्णाला ताप, उलटी, काविळ आणि सांधेदुखी अशी लक्षणं दिसून येतात. मात्र रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असलेल्या रुग्णांचा या आजारामुळे लिव्हरही फेल होतो. हाँगकाँगमध्ये कोरोनाव्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात आलं होतं. मात्र आता उंदरामार्फत पसरणाऱ्या या आजाराबाबत आरोग्य विभागानं लोकांना सावध केलं आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या