काबूल, 30 जानेवारी: एक गर्भवती पत्रकार अफगाणिस्तानमध्ये (Pregnant journalist) अडकली आहे. न्यूझीलंडमध्ये (New Zealand) राहणाऱ्या गर्भवती महिला पत्रकाराला तिच्याच देशात जाण्याची परवानगी मिळू शकली नाही, त्यामुळे ती अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) अडकून राहिली आहे. तिनं आता परत जाण्यासाठी तालिबानकडेच (Taliban) मदत मागितली आहे. शार्लोट बेलिस असे या पत्रकाराचे नाव असून कोरोना व्हायरस (Coronavirus) आयसोलेशनच्या (coronavirus isolation) नियमांमुळे तिला न्यूझीलंडमध्ये प्रवेश मिळू शकला नाही, असं तिचं म्हणणं आहे. न्यूझीलंड हेराल्डमध्ये शनिवारी प्रकाशित झालेल्या लेखात, बेलिस म्हणाले की, तालिबान ज्यांना त्यांनी महिलांवरील वागणुकीबद्दल प्रश्न विचारले होते, आता तोच प्रश्न माझ्या सरकारला विचारावा लागतोय हे खूप वाईट आहे. बेलिस यांनी या लेखात म्हटले आहे की, ‘जेव्हा तालिबान तुम्हाला आश्रय देईल, गर्भवती आणि अविवाहित महिलेला, तेव्हा तुमची परिस्थिती किती वाईट असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. वडिलांकडून अपहरणाची तक्रार; मुलीनं FB वर लिहिलं ‘‘GOT MARRIED’’,काय झालं नेमकं न्यूझीलंडचे कोविड-19 च्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देणारे मंत्री क्रिस हिपकिन्स यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या अधिकार्यांना बेलिसच्या प्रकरणात योग्य प्रक्रियेचे पालन केले आहे की नाही हे शोधण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान न्यूझीलंडला कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात यश आलं आहे. येथील लोकसंख्या 50 लाखांच्या जवळपास आहे, असे असूनही कोविड-19 मुळे मृतांची संख्या केवळ 52 आहे. दहा दिवसांचे आयसोलेशन नियम परदेशातून न्यूझीलंडला परतणाऱ्या नागरिकांना लष्कराच्या हॉटेलमध्ये दहा दिवस वेगळं राहावं लागतं. या कारणास्तव, आपल्या देशात परतण्याची वाट पाहणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. बेलिससारख्या कथा पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न (Prime Minister Jacinda Ardern) आणि त्यांच्या सरकारसाठी लाजिरवाण्या आहेत. बेलिस बऱ्याच काळापासून अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग करत आहे. गेल्या वर्षी अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्यानं माघार घेतल्यापासून ती येथे कार्यरत आहे. तालिबानला महिला आणि मुलींना मिळणाऱ्या वागणुकीबाबत प्रश्न विचारून त्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलं होतं. कतारमध्ये समजलं गर्भवती असल्याचं बेलिसने लेखात सांगितलं आहे की, ती सप्टेंबरमध्ये कतारला (Qatar) आली होती तेव्हा गरोदर असल्याचं समजलं. त्यापासून ती तिथे तिचा पार्टनर जिम ह्यूलब्रोकसोबत राहत होती, जो फ्रीलान्स फोटोग्राफर आहे. Breaking News: 12 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा; जैश कमांडर जाहिद वानीही ठार कतारमध्ये विवाहबाह्य लैंगिक संबंध बेकायदेशीर आहे, ज्यामुळे बेलिसला वाटलं की, त्यांनी हा देश सोडावा. तेव्हापासून ती नागरिकांच्या परतीसाठी लॉटरी-स्टाइस पद्धतीचा अवलंब करत आहे. मात्र तिला यात यश मिळत नाही.