काबूल 24 जानेवारी : अफगाणिस्तान (Afghanistan) या देशाची सत्ता पुन्हा एकदा तालिबाननं ( Taliban) ताब्यात घेण्यात यश मिळवलं. त्यातच आता तालिबानी राज्य म्हणजे नेमकं काय? तालिबानी राज्यात स्त्रियांचे स्थान काय? हे सांगणारं एक जिवंत उदाहरण ( living example ) समोर आलंय. तालिबान राजवटीबाबत प्रसिद्ध पॉर्न स्टार यास्मिना अली ( Yasmina Ali ) हिने अनेक धक्कादायक खुलासे केलेत. वन इंडिया हिंदीने याबाबत वृत्त दिलंय. अफगाणिस्तानची एकमेव आणि प्रसिद्ध पॉर्न स्टार यास्मिना अली ( famous porn star Yasmina Ali ) हिने तालिबान राजवटीबाबत ( Taliban regime ) अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. तालिबानच्या पहिल्या राजवटीत काही वर्षे राहिलेल्या यास्मिनाने तालिबानी नेते स्वत:ला तिच्या शरीराचे मालक कसे समजायचे, हे उघड केलं आहे. तिने ब्रिटीश वृत्तपत्र डेली स्टारशी संवाद साधला असून तालिबान राजवटीच्या काळातील तिच्या आयुष्याबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत. अफगाणिस्तानमधून पळून जाण्यात यशस्वी 1990 च्या दशकात जेव्हा तालिबानने पहिल्यांदा अफगाणिस्तानचा ताबा घेतला, तेव्हा यास्मिना ही लहान आणि बेघर होती. ती काबूलच्या रस्त्यावरून तालिबानची दहशत पाहत होती. तिने आपल्या डोळ्यांसमोर तालिबानी पुरुष स्त्री-पुरुषांवर कसे भयानक अत्याचार करीत होते, ते पाहिले. तिने तालिबानच्या राजवटीतून स्वत:ला वाचवत जीवनाचा संघर्ष सुरूच ठेवला आणि नंतर ती कशीतरी अफगाणिस्तानातून पळून जाण्यात यशस्वी झाली. यास्मिना शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये आली आणि दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबानी राजवट स्थापन झाली. पण, काळाने यस्मिनाला अनेक गोष्टी शिकवल्या असून ती आता एक सशक्त आणि सक्षम स्त्री बनली आहे. अबुधाबीतील घटनेनंतर UAE कडून ड्रोनवर बंदी, उडवल्यास होणार कायदेशीर कारवाई सुशिक्षित महिलांना तालिबानी घाबरतात डेली स्टारशी बोलताना यास्मिना अलीने तिचे अफगाणिस्तानमधील जीवन कसे संघर्षमय आणि तालिबानच्या अत्याचारांनी भरलेले होते, हे सांगितले. ती म्हणते, ‘मी लहान असताना माझी आई मला अनेकदा सांगायची की, तालिबानसाठी बलात्कारासारखी कोणतीही गोष्ट अस्तित्वातच नाही. याचा अर्थ त्यांना तो अत्याचार न वाटता त्यांचा अधिकार वाटतो.’ यास्मिना म्हणते, ‘जेव्हा तुम्ही तुमच्या आसपास अशी हिंसा पाहता, तेव्हा खूप निराश होता. फक्त महिलांनाच नाही, तर तालिबानी पुरुष मुस्लिम पुरुषांनाही बेदम मारहाण करायचे. तालिबानचे लोक धार्मिक पोशाख न घातल्यामुळे लोकांना बेदम मारहाण करायचे. ब्रिटनमध्ये जर एखाद्या महिलेवर कोणी अत्याचार केला तर तुम्ही कुणाला तरी मदतीसाठी हाक मारता, किंवा पोलिसांना फोन करता.. पण अफगाणिस्तानमध्ये ज्यांनी सत्ता काबीज केलेली आहे, त्याच लोकांकडून तुमच्यावर अत्याचार होत आहेत. मी जेव्हा 9 वर्षांची होते आणि अफगाणिस्तानात राहत होती, तेव्हा मला शिकण्याचा हक्क पण नव्हता. मी शाळेत जाऊ शकत नव्हते. प्रत्यक्षात तालिबानचे लोक महिलांना शिक्षित करण्यास घाबरतात. ते सुशिक्षित महिलांना घाबरतात,’ असे सांगतानाच यास्मिना म्हणाली, ’ तेथे सर्व नियम केवळ पुरुषांच्या फायद्यासाठी आणि आनंदासाठी आहेत. मासिक पाळीच्या दिवसात महिलेला अपवित्र आणि घाणेरडे समजले जाते. तालिबानची संपूर्ण विचारधारा ही महिलांना नियंत्रणात ठेवण्याची असते.’
यास्मिना अलीने पॉर्नच्या दुनियेत पाऊल ठेवले आणि लवकरच ती अफगाणिस्तानची नंबर वन पॉर्न स्टार बनली. स्वत:ला स्त्रीवादी कार्यकर्ती समजणारी यास्मिना स्वत:ला अफगाणिस्तानची नंबर वन आणि एकमेव पॉर्न स्टार मानते. तिने मुस्लिम धर्माचाही त्याग केला असल्याचे एका पॉडकास्टमधील संवादादरम्यान सांगितले होते. ती म्हणते, ‘तालिबानला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. ते माझा तिरस्कार करतात. कारण त्यांना वाटते की, अफगाणिस्तानला पॉर्न हब म्हणून कोणी ओळखू नये. मी माझे शरीर दाखवण्याची हिम्मत केली, याचा त्यांना राग येतो. तालिबानींना असे वाटते की, ते माझ्या शरीराचे मालक आहेत. मला माझे शरीर दाखवण्याचा अधिकार नाही, आणि मी तसे केले, तर मी खरी अफगाण होऊ शकत नाही. पण मी एक अफगाण आहे आणि तालिबानी लोक माझा व्हिडिओ पाहत असतील, याचे मला आश्चर्य वाटत नाही. इंटरनेटवर अफगाण पॉर्न शोधल्यावरच माझे नाव दिसते.’ अफगाणिस्तानातील सत्ता जवळपास 30 वर्षांनी पुन्हा एकदा तालिबानने ताब्यात घेतली आहे. त्यातच यास्मिना अलीने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. ते पाहता, अफगाणिस्तानमधील महिला कशा जगत असतील, याचा अंदाज येऊ शकतो.