पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसमध्ये
दिल्ली, 24 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या चार दिवसांपासून अमेरिका दौऱ्यावर होते. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील भारतीयांशी संवाद साधला. याशिवाय भारतीय अमेरिकन उद्योगपतींची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी व्हाइट हाउसने स्टेट डिनरचे आयोजन केले होते. यातही अनेक उद्योगपती, व्यावसायिक आणि इतर मान्यवर सहभागी झाले होते. चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी थेट इजिप्तला रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौरा संपल्यानंतर ट्विटरवर म्हटलं की, एक खूपच खास अमेरिका दौरा संपला. भारत अमेरिका यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध वाढवणाऱ्या अनेक कार्यक्रमात आणि संवादात भाग घेण्याची संधी मिळाली. देशात आणि जगात येणाऱ्या पिढ्यांसाठी चांगलं वातावरण तयार करण्यासाठी काम करत राहू असंही मोदी म्हणाले. अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर जाणार आहेत. PM मोदींसाठी व्हाइट हाऊसमध्ये डिनर, भारत-अमेरिकेतील बड्या उद्योगपतींची उपस्थिती
पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यानंतर अमेरिकन सरकार भारताच्या १०० हून अधिक जुन्या मूर्ती आणि वस्तू ज्या जोरी झाल्या होत्या त्या परत देणार आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, पुरातन वस्तू अनेक वर्षांपुर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचल्या होत्या. त्या परत करण्यसाठी अमेरिकन सरकारचे आभार. गेल्यावेळीही मला खूप साऱ्या ऐतिहासिक वस्तू दिल्या होत्या. जगभरात जिथे जातो तिथे लोकांना वाटतं की यांच्याकडे वस्तू द्यायला हव्यात. त्यांना मी योग्य व्यक्ती वाटतो जी व्यक्ती या वस्तू योग्य त्या ठिकाणी घेऊन जाईन. व्यापार तंत्रज्ञान सहकार्याचे नवे पर्व सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याबरोबरील द्विपक्षीय चर्चेची फलनिष्पत्ती म्हणून भारत-अमेरिका व्यापार-तंत्रज्ञान सहकार्याचे नवे पर्व सुरू झाले आहे. भारतीय वायुदलासाठी जेट इंजिनांची सहनिर्मिती, संरक्षण उद्योगात भागीदारी, अंतराळ क्षेत्रात सहकार्य, सेमिकंडक्टर पुरवठा साखळी आणि संशोधनात भागीदारी, नव्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भागीदारी आदींबाबतचे करार यावेळी करण्यात आले.