पीएम नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना दिलं गिफ्ट
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी अनोखं गिफ्ट दिलं. या गिफ्टची चर्चा जगभरात होत आहे. त्यांनी चंदानापासून तयार केलेली सितार (वीणा) भेट म्हणून दिली. त्यावर सुंदर असं बारीक नक्षीकाम करण्यात आलं आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी, फ्रान्सचे पंतप्रधान, फ्रेंच सिनेटचे अध्यक्ष आणि फ्रेंच नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांनाही पंतप्रधान मोदींनी भेटवस्तू दिल्या. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना भेट देण्यात आलेल्या सितार वाद्याची अनोखी प्रतिकृती शुद्ध चंदनापासून तयार करण्यात आली आहे. यावर श्रीगणेश विरजमान असल्याचं नक्षीकाम करण्यात आलं आहे. भारतीय संस्कृतीचं दर्शन या सितारवर करण्यात आलं आहे.
मॅक्रॉन यांच्या पत्नीला चंदनाच्या पेटीतून पोचमपल्ली सिल्क साडी भेट म्हणून दिली आहे. भारतातील तेलंगणातील पोचमपल्ली शहरात हे खास सिल्क तयार केलं जातं. पोचमपल्ली रेशीम इकत फॅब्रिक हे भारताच्या वैभवशाली वस्त्रोद्योग वारशाचा पुरावा असल्याचं सांगितलं जातं. इकत रेशीम फॅब्रिक सजावटीच्या चंदनाच्या बॉक्समधून देण्यात आलं. फ्रान्सच्या सिनेटचे अध्यक्ष गेरार्ड लार्चर यांना पंतप्रधान मोदींनी हाताने कोरलेला चंदनाचा अंबावारी हत्ती भेट दिला. शुद्ध चंदनापासून बनवलेल्या, उत्कृष्ट हत्तीच्या मूर्ती कृपा आणि वैभव प्रकट करतात.
पंतप्रधानांनी फ्रेंच नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष याल ब्रॉन-पिवेट यांना हाताने विणलेला रेशमी काश्मिरी गालिचा भेट दिला.
यामध्ये वेगवेगळ्या रंगछटा आहेत. ज्या दिवसा आणि रात्री वेगवेगळ्या दिसतात. फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांना संगमरवरी इनले टेबल टॉप भेट देण्यात आला.