इस्लामाबाद, 02 फेब्रुवारी: अमेरिकन पत्रकार (American Journalist) डॅनियल पर्ल (Daniel Pearl) यांच्या हत्येतील (Murder) मुख्य आरोपीची पाकिस्तान न्यायालयाने (Pakistan Supreme Court) मुक्तता केली आहे. मुक्तता करण्यापूर्वी अमेरिकेने विरोध केला होता. पाकिस्तान न्यायालयाने अमेरिकेच्या विरोधाला डावलून डॅनियल पर्ल यांचा मारेकरी आणि अल कायदाचा आतंकवादी अहमद उमर सईद शेख (Ahmad Omar Saeed Sheikh) याची मुक्तता (Release) केली आहे. पाकिस्तान न्यायालयाने अहमद शेख याला सुरक्षितपणे त्याच्या घरी सोडलं आहे. डॅनियल पर्लचे अपहरण (Kidnap) आणि हत्या (Murder) केल्याच्या प्रकरणात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अल कायदा संघटनेचा आतंकवादी अहमद उमर सईद शेख आणि अन्य दोघांची निर्दोष मुक्तता केली होती. यामुळे अमेरिकेने या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करत त्यांची सुटका करू नये, यासाठी याचिका दाखल केली होती. पण पाकिस्तान सर्वोच्चा न्यायालयाने अमेरिकेचा विरोध झुगारून आरोपीची मुक्तता केली आहे. न्यायालयाने संबंधित याचिकेला केराची टोपली दाखवली आहे. (हे वाचा- OMG! स्मोकिंगमुळे हळदीसारखं पिवळं धमक पडलं त्याचं शरीर ) नेमकं प्रकरण काय आहे? 2002 मध्ये पाकिस्तानातील कराची येथे अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल यांची हत्या करण्यात आली होती. यावेळी डॅनियल पर्ल ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या वर्तमानपत्राचे दक्षिण आशियातील ब्युरो प्रमुख होते. (हे वाचा- नासाच्या प्रमुख पदी भारतीय वंशाच्या महिलेची वर्णी; जाणून घ्या Bhavya Lal यांच्याविषयी ) 2002 मध्ये डॅनियल पर्ल पाकिस्तान गुप्तचर यंत्रणा आणि अल कायदा यांच्या संदर्भात काही माहिती मिळवत होते. याचा सुगावा आतंकवादी संघटनांना लागला. त्यामुळे काही लोकांनी त्यांच अपहरण केलं आणि त्यांचा शिरच्छेद करून त्यांची हत्या केली गेली. त्यांच्या हत्येने संपूर्ण जगभर पडसाद उमटले होते. इतक्या हाय प्रोफाईल केसमधील आरोपीची पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं मुक्तता केली आहे.