JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Corona Virus: Omicron व्हेरिएंटवर दक्षिण आफ्रिकेत तज्ज्ञांचा अभ्यास, समोर आले धक्कादायक खुलासे

Corona Virus: Omicron व्हेरिएंटवर दक्षिण आफ्रिकेत तज्ज्ञांचा अभ्यास, समोर आले धक्कादायक खुलासे

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंटबाबत तज्ज्ञांनी अभ्यास केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 डिसेंबर: दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंटबाबत केलेल्या अभ्यासामुळे दिलासा मिळाला आहे. असं आढळून आलं आहे की, ऑक्‍टोबर ते नोव्‍हेंबरमध्‍ये (October and November), इतर व्हेरिएंटची लागण झालेल्या लोकांच्‍या तुलनेत ओमायक्रॉन संक्रमित लोकांना रुग्णालयात दाखल करण्‍याची शक्यता 80 टक्‍के कमी होती. यासोबत, असेही सांगण्यात आले आहे की काही ठिकाणी हा व्हेरिएंट कमी संसर्गजन्य देखील असण्याची शक्यता आहे. यावर जोर देण्यात आला आहे की, अभ्यासाचे निष्कर्ष असे सुचवत नाहीत की व्हेरिएंट ऑफ कंसर्न (VOC) कमी तीव्र आहे. मात्र पहिल्या संसर्गानंतर प्रतिकारशक्ती प्राप्त केलेल्या लोकसंख्येमध्ये ते कमी तीव्रतेने दिसू शकते. ओमायक्रॉनची लागण झालेल्या लोकांना डेल्टा व्हेरिएंटनं संक्रमित झालेल्या लोकांपेक्षा गंभीर आजार होण्याची शक्यता 70 टक्के कमी असल्याचं दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांनी केलेल्या पहिल्या अभ्यासात असं आढळून आलं आहे. हेही वाचा-   Corona Virus चा विळखा, शाळेतील 29 विद्यार्थी पॉझिटिव्ह दरम्यान जर ओमायक्रॉन व्हेरिएंटने संसर्ग झालेल्या लोकांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असल्यास, तर ते गंभीर आजारी पडण्याची शक्यता त्यांच्यापेक्षा कमी नाही. ज्यांना सद्यस्थितीतील लहरी दरम्यान इतर व्हेरिएंटचा संसर्ग झाला असल्याचं आढळून आलं आहे. दुसऱ्या अभ्यासात, दक्षिण आफ्रिकेतील आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, गुटांगमध्ये पहिल्या कोविड-19 चा झपाट्याने पसरल्यामुळे या आजाराची तीव्रता कमी होऊ शकते. ओमायक्रॉन हे गुटांग प्रांतात पहिलं होतं आणि या क्षेत्राचीही अभ्यासात काळजी घेण्यात आली होती. दोन्ही अभ्यासांमध्ये प्राथमिक डेटा समाविष्ट केला गेला आहे. दुसर्‍या अभ्यासात असे आढळून आले की, लस न मिळालेल्या अंदाजे लोकसंख्येपैकी किमान 68 टक्के लोकांना ओमायक्रॉन लहरीपूर्वी संसर्ग झाला होता. हेही वाचा-  Kohli vs Ganguly: माजी कॅप्टनची विराटला साथ, गांगुलीला सुनावले खडे बोल   नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेसच्या सेंटर फॉर रेस्पिरेटरी डिसीजेस अँड मेनिंजायटीस येथील प्रोफेसर शेरिल कोहेन यांनी पत्रकारांना सांगितलं की, ज्या भागात मोठ्या संख्येनं लोकांना संसर्ग झाला आहे त्या भागात परिणाम जास्त आहेत. दरम्यान ज्या देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण जास्त आहे. मात्र संसर्गाचे प्रमाण कमी आहे अशा देशांवर ओमायक्रॉनचा कसा परिणाम होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या