JOIN US
मराठी बातम्या / विदेश / मुलाने पॉर्न पाहिला तर North Korea चा हुकूमशहा भडकला; संपूर्ण कुटुंबाला दिली भयंकर शिक्षा

मुलाने पॉर्न पाहिला तर North Korea चा हुकूमशहा भडकला; संपूर्ण कुटुंबाला दिली भयंकर शिक्षा

North Korea : अनेकांना पॉर्न पाहिल्या प्रकरणी मृत्यूची शिक्षा ठोठावली आहे.

जाहिरात

उत्तर कोरिया हा छोटासा देश असूनही त्यांची लष्करी ताकद इतर विकसनशील देशांपेक्षा जास्त आहे. नुकतेच त्यांनी बॅलिस्टिक मिसाइल लॉंच केले. जगातील सर्वात शक्तिशाली मिसाइल म्हणून बॅलिस्टिक ओळखले जाते. या देशात एक-दोन नव्हे तर चार मिसाइल आहे. यादरम्यान, ही चर्चा देखील सुरू आहे की, सर्वात शक्तिशाली देश, उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर कदाचित अमेरिकेला किम जोंग उन यांच्याशी लढा देणं कठिण आहे. (news18 English)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्योंगयांग, 22 मार्च : उत्तर कोरिया (North Korea) सरकारने संपूर्ण देशात पॉर्न विरोधात मोहीम सुरू केली आहे. इतकच नाही तर सत्ताधारी वर्कर्स पक्षाने शाळेत पॉर्न विरोधात जागरुकता अभियान देखील सुरू केलं आहे. याशिवाय पॉर्न संबंधित जोडलेल्या लोकांना मृत्यूची शिक्षा दिली जात आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जोंग ऊन यांच्यानुसार पॉर्नमुळे समाज खराब होतो. अशात शाळेत एका मुलाने पॉर्न पाहिल्यानंतर किम जोंगने (Kim Jong Un) केवळ मुलालाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला भयंकर शिक्षा सुनावली आहे. (North Korean school boy watches porn video Kim Jong Un gives horrible punishment) डेली एनकेच्या रिपोर्टनुसार एका किशोरवयीन मुलाने आपल्या घरात पॉर्न पाहण्याची चूक केली. त्यावेळी मुलाचे आई-वडील घरात नव्हते. मात्र उत्तर कोरियाच्या पोलिसांनी आयपी एड्रेस ट्रॅक करीत मुलाला पॉर्न पाहत असताना रंगेहाथ पकडलं. पॉर्न व्हिडिओ पाहण्याच्या गुन्ह्याखाली मुलाला संपूर्ण कुटुंबासह सीमेजवळ सोडून देण्यात आलं आणि समाजातून बाहेर करण्याची शिक्षा सुनावण्यात आली. सुदैवाने या प्रकरणात त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली नाही, असं म्हटलं जात आहे. हे ही वाचा- कोर्टाने सुनावली 212 वर्षांची शिक्षा, नात्याला काळीमा फासणारा केला गुन्हा हा मुलगा ज्या शाळेत शिकत होत, त्याच्या मुख्यध्यापकांनाही सोडलं नाही. उत्तर कोरियाच्या नियमांनुसार शाळेतील मुलांच्या चुकीमागे त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापकांना दोषी ठरवलं जातं. या प्रकरणात सांगितलं जात आहे की, शिक्षक आपली जबाबदारी पूर्ण करू शकले नाही. अशात मुख्याध्यापकांना लेबर कॅम्पमध्ये पाठविण्यात आलं. येथे त्याला कठोर मेहनत करावी लागत आहे. उत्तर कोरियात अत्यंत कडक कायदे असून त्याचे पालनदेखील कठोर पद्धतीने केले जातात. येथे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पूर्ण देशाला एक वर्षांपेक्षा अधिक काळासाठी लॉकडाऊनमध्ये राहावं लागलं होतं. कोणत्याही व्यक्तीला देशाबाहेर किंवा देशात येण्याची परवानगी नव्हती. उत्तर कोरियातील पोलीस आणि सैन्याने देशात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर थेट गोळी झाडली होती आणि त्यांना समुद्रात फेकण्यात आलं होतं. North Korean school boy, watches porn video, Kim Jong Un gives horrible punishment

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या