JOIN US
मराठी बातम्या / विदेश / किम जोंगचा उन्माद शिगेला, या महिन्यातील सलग चौथी Missile Test

किम जोंगचा उन्माद शिगेला, या महिन्यातील सलग चौथी Missile Test

उत्तर कोरियाने जानेवारी महिन्यातील सलग चौथी क्षेपणास्त्र चाचणी करून जगाची चिंता वाढवली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिउल, 17 जानेवारी: उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) यांचा उन्माद सुरूच असून एकाच महिन्यात सलग चौथी क्षेपणास्त्र चाचणी (Fourth Missile Test) घेण्यात आली आहे. दक्षिण कोरिया (South Korea) आणि जपान (Japan) या दोन्ही शेजारी देशांनी या घटनेची खातरजमा केली असून ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेच्या निर्बधांना आणि दबावाला आपण मुळीच जुमानत नसल्याचं दाखवून देण्यासाठीच उत्तर कोरियाकडून वारंवार हे प्रकार केले जात असल्याचं दिसून येत आहे.   डागली दोन क्षेपणास्त्रं सोमवारी डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रानं एकूण 380 किलोमीटरचा प्रवास केला. यावेळी क्षेपणास्त्रानं गाठलेली कमाल उंची होती 42 किलोमीटर. या घटनेनंतर दक्षिण कोरिया आणि जपान या दोन्ही देशांनी चिंता व्यक्त केली असून तातडीनं युरोपीय देशांनी यासंदर्भात बैठक घेऊन तणाव हलका करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. उत्तर कोरिया हा अण्वस्त्रधारी देश असून तो सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांची चाचणी करू लागला आहे. या क्षमतेमुळे हा देश काहीही करू शकतो आणि केवळ शेजारी देशच नव्हे, तर जगाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मोठा धोका ठरू शकतो, असं मत या दोन्ही देशानी व्यक्त केलं आहे.   यापूर्वी केल्या तीन चाचण्या या वर्षात उत्तर कोरियानं केलेली ही चौथी मिसाईल चाचणी आहे. यापूर्वीच्या तीन चाचण्या या देशानं केल्या आहेत. त्यातील दोन चाचण्या हायपरसोनिक मिसाईलच्या होत्या, तर तिसरी चाचणी बॅलेस्टिक मिसाईलची होती. उत्तर कोरियानं या तिन्ही चाचण्या केल्याचं मान्य केलं असून हुकूमशहा किम जोंग यांनी अधिक क्षमतेची क्षेपणास्त्रं तयार करण्याचे आदेश दिले आहेत.   हे वाचा -

भूमिकेवर किम जोंग ठाम प्रत्येक देशाला आपल्या संरक्षणसज्जतेचा अधिकार असल्याची प्रतिक्रिया उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आपण घेतलेल्या मिसाईल टेस्टमुळे कुठल्याही शेजारी देशाला काहीही नुकसान झालेलं नाही. स्वतःच्या देशाचं संरक्षण करणं हा प्रत्येकाचा अधिकार असून त्यानुसार आम्ही आमच्या संरक्षणाची क्षमता वाढवत आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या