JOIN US
मराठी बातम्या / विदेश / नोबेल पुरस्कार विजेती Malala Yousafzai अडकली लग्नबेडीत, पाहा बर्मिंगहॅममधील लग्न सोहळ्याचे सुंदर Photos

नोबेल पुरस्कार विजेती Malala Yousafzai अडकली लग्नबेडीत, पाहा बर्मिंगहॅममधील लग्न सोहळ्याचे सुंदर Photos

शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकणारी मलाला युझफझाई बर्मिंगहॅममध्ये (Malala Yousafzai got Married in Birmingham) लग्नबेडीत अडकली आहे. मलाला आणि तिचा पार्टनर असर यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाबाबत जाहीर केले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बर्मिंगहॅम, 10 नोव्हेंबर: शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकणारी मलाला युसूफझाई बर्मिंगहॅममध्ये (Malala Yousafzai got Married in Birmingham) लग्नबेडीत अडकली आहे. मलाला आणि तिचा पार्टनर असर (Malala Yousafzai Husband) यांनी त्यांच्या लग्नाबाबत जाहीर केले आहे. तिच्या छोटेखानी लग्नसोहळ्याचे (Malala Yousafzai Nikkah Photos) फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. मलालाने स्वत: सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ही आनंदवार्ता दिली आहे. फोटो शेअर करताना मलालाने असं लिहिलं आहे की तिने लग्न केलं आणि ती पुढील आयुष्यासाठी उत्साहित आहे. मलालाने पती असर, तिचे आई-वडील जियाउद्दीन युसूफझाई आणि पेकाई युसूफझाई यांच्यासह काही फोटो पोस्ट केले आहेत. यावेळी मलालाने ट्विटरवर असे लिहिले आहे की, ‘आज माझ्या आयुष्यातील खास दिवस आहे. आयुष्यभरासाठी एकमेकांचे साथीदार म्हणून मी आणि असरने लग्न केले आहे. आम्ही आमच्या बर्मिंगहॅममधील घरी कुटुंबीयांसह छोटेखानी निकाह सोहळा साजरा केला. कृपया तुमचे आशीर्वाद असूद्या. पुढील प्रवास एकत्र करण्यासाठी आम्ही खूप उत्साहित आहोत.’

संबंधित बातम्या

मलालाचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला होता. 2012 साली वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी तिच्यावर तालिबानी आतंकवाद्यांनी गोळी झाडली होती. मुलींच्या शिकण्याच्या अधिकारासाठी सार्वजनिकपणे बोलल्याबद्दल तिच्यावर गोळी झाडण्यात आली होती. त्यावेळी तिला बर्मिंगहॅममधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे वाचा- वाढदिवशी भावांनी दिलं सरप्राईज, डोळ्यात आलं पाणी; पाहा Emotional Video बर्मिंगहॅममधील रुग्णालयातच ती बरी झाली आणि नंतर मुलीच्या शिक्षणासाठी तिने काम सुरूच ठेवले. तिने तिच्या वडिलांच्या मदतीने यूकेमध्ये मलाला फंड सुरू केला. याअंतर्गत मुलींना त्यांच्या आवडीचे भविष्य निवडण्यासाठी मदत करण्यास तिने सुरुवात केली. मलालाच्या उल्लेखनीय कामासाठी तिला 2014 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार (Ms Yousafzai received the Nobel Peace Prize in December 2014) देण्यात आला. मलाला सर्वात कमी वयाची नोबेल पुरस्कार विजेती आहे. तिने ऑक्सफर्ड विद्यापीठात तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला आणि 2020 मध्ये पदवी प्राप्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या