JOIN US
मराठी बातम्या / विदेश / शांततेच्या नोबेल पुरस्कार विजेत्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, काय होते आरोप?

शांततेच्या नोबेल पुरस्कार विजेत्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, काय होते आरोप?

एलेस यांना गेल्या वर्षा शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. बेलारूसच्या न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला सुरू होता.

जाहिरात

bialiatski

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मिंस्क, 03 मार्च : नोबेल पुरस्कार विजेत्या एलेस बालियात्स्की यांना न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. एलेस यांना गेल्या वर्षा शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. बेलारूसच्या न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला सुरू होता. यामध्ये बेलियात्स्की यांच्यासह तिघांवर सरकार विरोधी आंदोलनाला आर्थिक रसद पुरवल्याचा आरोप होता. यात तिघेही दोषी आढळल्यानतंर न्यायालयाने 10  वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 2020 च्या निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणात विरोध केल्यानतंर त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हा सत्ताधारी राष्ट्रपती लुकाशेंको यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मदतीने त्यांच्या टीकाकारांना तुरुंगात डांबलं होतं. काहींना देशाबाहेरही घालवण्यात आलं होतं. हातावर नित्यानंदचा टॅटू, 4 भाषांमध्ये पारंगत, UN मधील कैलासाची सुंदर राजदूत कोण?   बेलियात्स्की, स्टेफानोविच, लॅबकोविच हे जुलै २०२१ पासून ताब्यात आहेत. सुरुवातीला त्यांच्यावर कर चोरीचा आरोप केला होता. विरोधी आंदोलनाला पैसे पुरवण्यासाठी बेलारूसमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांची तस्करी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. असे आरोप सिद्ध झाल्यास सात ते १२ वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या