JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Nigeria : मध्यरात्री नदीत उलटली नाव, 100 जणांचा मृत्यू; लग्न सोहळ्याहून परतताना दुर्घटना

Nigeria : मध्यरात्री नदीत उलटली नाव, 100 जणांचा मृत्यू; लग्न सोहळ्याहून परतताना दुर्घटना

नायजेरियात स्थानिकांनी तयार केलेल्या नावेचा नदीतून प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळेच अशा दुर्घनटा तिथे घडतात.

जाहिरात

नायजेरियात बोट नदीत उलटली, 100 जणांचा मृत्यू

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अबुजा, 14 जून : नायजेरियात मंगळवारी नाव नदीत उलटल्याने मोठी दुर्घटना घडलीय. उत्तर नायजेरियात एका लग्न सोहळ्याला गेलेल्या नागरिकांना घेऊन जाणारी नाव बुडाल्याने जवळपास 100 जणांना जलसमाधी मिळाली. या सर्वांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे. पोलीस आणि स्थानिक प्रवाशांच्या हवाल्याने एएनआयने म्हटलं की, या दुर्घनटेत वाचलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. पोलीस प्रवक्ते ओकासनमी अजयायी यांनी सांगितले की, नायजर जवळच्या क्वारा राज्याच्या हद्दीतील नायजर नदीत नाव उलटली. या भीषण दुर्घटनेत 100 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. पण अद्याप शोधमोहिम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भितीही व्यक्त केली जात आहे. बिपरजॉयचा धोका वाढला, मोठ्या नुकसानीची शक्यता, मान्सूनवर होणार परिणाम?

संबंधित बातम्या

स्थानिक रहिवाशी उस्मान इब्राहिम यांनी सांगितलं की, पीडित महिला आणि मुले नायजर राज्यातील एगबोटी गावात लग्नसोहळ्यासाठी गेले होते. रात्री लग्न आटोपून ते परत येत असताना ही दुर्घटना घडली. नावेत 100 हून जास्त लोक होते. ही दुर्घटना पहाटे तीनच्या सुमारास घडल्याने याबाबत अनेक तासांनी इतरांना माहिती मिळाली. नायजेरियातील सर्वात मोठ्या नदीत ही दुर्घटना घडली आहे. घटनेनंतर पोलीस अधिकारी आणि स्थानिक लोक दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. नायजेरियात अशा दुर्घटना सतत घडत असतात. स्थानिकांनी तयार केलेल्या नावेचा नदीतून प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळेच अशा दुर्घनटा तिथे घडतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या