JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Coronavirus पासून बचावासाठी महत्त्वाचं सोशल डिस्टेसिंग; किती असावं सुरक्षित अंतर?

Coronavirus पासून बचावासाठी महत्त्वाचं सोशल डिस्टेसिंग; किती असावं सुरक्षित अंतर?

Coronavirus पासून वाचण्यासाठी 1 मीटर अंतर पुरेसं नाही, असं काही संशोधनात दिसून आलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीजिंग, 15 एप्रिल : कोरोनापासून (CoronaVirus) बचावाचा एक मार्ग म्हणजे सोशल डिस्टेंसिंग (Social Distancing). कोणतीही व्यक्ती आपल्या जवळ आली तर तिच्यात आणि आपल्यात पुरेसं अंतर ठेवणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कोरोनाव्हायरसपासून वाचण्यासाठी 2 व्यक्तींमध्ये किमान 1 मीटर म्हणजे 3 फूट अंतर असायला हवं. याचं पालन सार्वजनिक ठिकाणी होताना दिसतं आहे. मात्र व्हायरसबाबत होत असलेल्या संशोधनानुसार कोरोनाव्हायरस यापेक्षाही जास्त दूर जाऊ शकतो. चीनच्या वुहानमधील रुग्णालयात करण्यात आलेल्या अभ्यासात डॉक्टरांना दिसून आलं की, रुग्णापासून 6 फूट दूर राहणा-यांना कोरोनाव्हायरसची लागण झाली नाही. भारतातल्या वटवाघळांमध्ये सापडला CORONAVIRUS, हा घ्या पुरावा मात्र आता नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार कोरोनाग्रस्तापासून 13 फूट दूरपर्यंत व्हायरस पसरू शकतो. कोरोनाव्हायरसपासून वाचण्यासाठी लोकांमध्ये 6 फूट नाही तर त्यापेक्षा दुपटीहून अधिक दूर राहण्याची गरज आहे. चीनच्या Academy of Military Medical Sciences च्या शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला. Emerging infectious diseases या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. तर अमेरिकेतल्या Massachusetts Institute of Technology च्या शास्त्रज्ञांनी याआधी केलेल्या अभ्यासानुसार, कोरोनाव्हायरस 27 फूट अंतरापर्यंत व्यक्तीलाही संक्रमित करू शकतो आणि मोकळ्या हवेत एक तासापेक्षाही जास्त वेळ राहू शकतो. CoronaVirus विरोधात लढा; योद्धांच्या मदतीसाठी विषाणूचा नाश करणारा मायक्रोव्हेव कोरोनाव्हायरससाठी सोशल डिस्टेसिंगबाबत असे वेगवेगळे संशोधन होत असले तरी त्यामुळे आपण सध्या जे सोशल डिस्टेसिंग पाळत आहोत त्याचा काही उपयोग नाही असं नाही. कोरोनाव्हायरसला आपल्यापासून दूर ठेवण्याचा हा एक मार्ग आहे. त्यामुळे आता कोरोनाव्हायरसपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तुम्हाला शक्य तितकं जास्तीत जास्त सोशल डिस्टेसिंग ठेवा. शिवाय मास्क घालणं, हात स्वच्छ धुणं आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घेणंही गरजेचं आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या