वॉशिंग्टन, 16 सप्टेंबर : NASA ने मंगळावर पाठवलेल्या क्युरिओसिटी रोव्हरने (Curiosity Rover ) मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाचा एक VIDEO नुकताच पाठवला. त्यात भुतासारखी दिसणारी एक प्रतिमा अचानक निर्माण होते आणि सरकताना दिसते. मंगळावरचा हा भुताटकीचा प्रकार नसून खरं तर हे ‘डस्ट डेव्हील’(Dust Devil) आहे. डस्ट डेव्हिल नावानं ओळखला जाणारा हा एक प्रकारचा निसर्गाचा चमत्कार किंवा अद्भुत खेळ आहे. NASA अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. ही अंतराळ संस्था आपल्याला अवकाशात घडणाऱ्या अनेक अदभुत घटनाविषयी त्यांच्या उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्रांधून माहिती देते. दोन दिवसापूर्वीच या अंतराळ संशोधन केद्राने सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रसारित केला होता. या व्हिडीओत मंगळ ग्रहावरील ‘डेविल डस्ट’ दर्शविणारा एक आकर्षक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. मंगळावरील चक्रीवादळाचा हा व्हिडीओ आहे. 9 ऑगस्ट रोजी नासाच्या क्युरियोसिटी रोव्हरने हा व्हिडीओ चित्रित केला आहे. हे रोव्हर मंगळ ग्रहावरील गॅल क्रेटरचा शोध 2012 पासून घेत आहे. मंगळवारचं हे विवर शोधणं पुढच्या संशोधनाच्या दृष्टीने आवष्यक आहे. पण या विवराच्या शोधात असकाना 9 ऑगस्ट रोजी, रोव्हरच्या एका नेव्हिगेशन कॅमेऱ्याने एक भन्नाट प्रकार चित्रित केला. अचानक मंगळाच्या जमिनीवर वाऱ्याचा एक भोवरा यात तयार होताना दिसतो. सूक्ष्म वादळासारखा हा सरकत जातानाही दिसतो. यालाच डेविल डस्ट म्हणून ओळखलं जातं, असं नासाने सांगितलं.
याबाबत अंतराळ केंद्राने माहिती दिली की, “व्हीडिओत दिसणारं डेविल डस्ट मंगळावरच्या लहान टेकड्यांमधून वर जात आहे. रोव्हर माउंट गेल क्रेटरमधील एका शिखरावर ठेवला गेला होता, त्या वेळी त्याला हे ‘वादळी भूत’ दिसलं. धुळीचे वादळ रोव्हरपासून अंदाजे एक तृतीयांश ते दीड मैल दूर होतं. आणि त्याची लांबी अंदाजे 16 फूट होती. फ्रेमच्या वरच्या भागावरून अदृश्य झाल्यामुळे डस्ट प्लमची उंची किती आहे हे सांगता येत नाही, असं नासाने म्हटले आहे. तथापि, ते 164 फूट असू शकेल असा अंदाज आहे. मंगळ ग्रहावरील अशा वावटळ किंवा वादळ निर्मितीमुळे या ग्रहांवर मानवी वस्ती निर्माण करण्याच्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे येऊ शकतात, असे एका व्रत्त संस्थेने म्हटले आहे. हे कण एकमेकांच्या संपर्कात येऊ शकतात, ज्यामुळे घर्षण उद्भवतंं. मंगळाच्या अत्यंत कोरड्या हवामानामुळे ते हवेत इलेक्ट्रिक फील्ड निर्माण करतात. मंगळ ग्रहावर प्राचीन सूक्ष्मजीव जीवनाचे पुरावे शोधण्यासाठी नासाने जुलै महिन्यात फ्लोरिडाच्या केप कॅनॅव्हेरल अॅटलस 5 रॉकेटमधून पर्सिरव्हन्स रोव्हर अवकाशात प्रक्षेपित केला होता.