कॅलिफोर्निया, 3 जानेवारी: कॅलिफोर्नियात (California) राहणाऱ्या एका महिलेनं (Woman) नुकताच जुळ्या मुलांना (Twins) जन्म (Birth) दिला. मात्र जन्माची वेळ अशी होती की त्यातलं एक मूल 2021 साली जन्माला आलं आणि (Bron in different years) दुसरं मूल थेट 2022 साली. वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि प्रश्नही पडेल की हे कसं शक्य आहे. तर हे शक्य झालं जन्माचा दिवस आणि वेळ यामुळं. वेगवेगळ्या वर्षी जुळ्यांचा जन्म कॅनिफोर्नियात राहणारी फातिमा मॅड्रिगल आणि रॉबर्ट ट्रुजिलो यांनी नुकताच जुळ्या बाळांना जन्म दिला. डिलिव्हरीसाठी फातिमा 31 डिसेंबरला हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या. रात्री 11 नंतर त्यांना प्रसववेदना सुरू झाल्या आणि डॉक्टरांनी बाळाच्या जन्माची प्रक्रिया सुरू केली. फातिमा यांनी 31 तारखेला रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर 15 मिनिटांनी दिवस बदलल्यावर दुसऱ्या बाळाचा जन्म झाला. पहिला होता मुलगा तर दुसरी होती मुलगी. दोघांच्या जन्मात काही मिनिटांचा फरक होता, मात्र त्यामुळे दोघंही वेगवेगळ्या सालात जन्माला आले.
हॉस्पिटलनं व्यक्त केला आनंद हॉस्पिटलच्या इतिहासात एक वेगळाच विक्रम यामुळे जमा झाल्याचं नेटिवडॅड नावाच्या हॉस्पिटलनं ट्विट करून जाहीर केलं. जुळी बाळं असूनही दोघांच्या जन्माचा वार आणि तारीखच नव्हे, तर सालदेखील वेगवेगळं असल्याचं ट्विट हॉस्पिटलनं केलं आणि आपल्या कारकिर्दीतील ही एक ऐतिहासिक घटना होती, असं हे ऑपरेशन करणाऱ्या ऍना ऍब्रिल नावाच्या डॉक्टरांनी म्हटलं आहे. हे वाचा -
भारतातदेखील झाला विक्रम भारतातदेखील अशाच प्रकारे 30 मिनिटांच्या फरकांने जुळ्या मुलांचा जन्म झाल्यामुळे एक बाळ 2021 सालात तर दुसरं बाळ 2022 सालात जन्मल्याचं WRTY च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.