Missiles
नवी दिल्ली, 13 मार्च: इराणच्या (iran) हद्दीतून डागण्यात आलेली सुमारे 12 क्षेपणास्त्रे शनिवारी रात्री वायव्य इराकमधील एर्बिलमधील(Erbil) यूएस वाणिज्य दूतावासाजवळ पडली. इराकी न्यूज एजन्सी (INA) च्या मते, कुर्दिस्तान काउंटर-टेररिझम सर्व्हिसने कळवले आहे की, इराक आणि कुर्दिस्तान प्रदेशाच्या सीमेबाहेरून, विशेषत: पूर्वेकडून 12 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. इंडिपेंडेंट ओपन-सोर्स इंटेलिजन्स (OSINT) ने त्याच्या ट्विटर हँडलवरून काही व्हिडिओ शेअर केले आहेत, जे इराणी नागरिकांनी त्यांच्या मोबाईलवर रेकॉर्ड केले होते. या व्हिडिओंमध्ये क्षेपणास्त्रे डागताना दिसत आहेत. यापैकी किमान एक व्हिडिओ इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांतातील खासाबाद येथील एका साइटवर आहे. ईस्टर्न युरोपीयन मीडिया नेक्सटाने दिलेल्या माहितीनुसार, ही क्षेपणास्त्रे इराकमधील अमेरिकन दूतावासाच्या कॅम्पसच्या दिशेने डागण्यात आली. एरबिलचे गव्हर्नर ओमाद खोश्नाव यांनी सांगितले की, त्यांच्या भागात अनेक क्षेपणास्त्रे पडली आहेत. हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासावर होते की शहरातील विमानतळावर होते हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या हल्ल्यात नुकसान झाल्याचे वृत्त आहे, क्षेपणास्त्र हल्ल्यात कोणतीही अमेरिकन जीवितहानी झाली नाही. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये अनेक मोठे स्फोट दिसत आहेत. अशी माहिती कुर्दिस्तानच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
“एरबिल या प्रिय शहराला लक्ष्य करून तेथील रहिवाशांमध्ये भीती निर्माण करणारे आक्रमण आमच्या लोकांच्या सुरक्षेवर हल्ला आहे. मी या घटनांबद्दल KRG PM शी चर्चा केली. आमचे सुरक्षा दले तपास करतील आणि आमच्या लोकांना कोणत्याही संकटाच्या विरोधात खंबीरपणे उभे राहतील.“असे ट्विट इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कादिमी यांनी केले.
तसेच, अरबील भ्याड लोकांपुढे झुकत नाही. एरबिलच्या काही भागांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि येथील धाडसी आणि धैर्यवान लोकांना धीर धरण्याचे आवाहन करतो. सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचे पालन करा. तुमच्या संयमाबद्दल मी तुमचा आभारी आहे.” ही क्षेपणास्त्रे कोणी आणि का डागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे कुर्दिस्तान प्रदेशाचे पंतप्रधान मसरूर बरझानी यांनी म्हटले आहे.