JOIN US
मराठी बातम्या / विदेश / अफगाणिस्तानात पुन्हा सुरु होतंय ‘ते’ बदनाम मंत्रालय, सामान्यांचं जगणं होणार वेदनादायक

अफगाणिस्तानात पुन्हा सुरु होतंय ‘ते’ बदनाम मंत्रालय, सामान्यांचं जगणं होणार वेदनादायक

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानचं (Taliban) सरकार आल्यानंतर आता असं एक मंत्रालय (Minister) सुरु होतंय, ज्यामुळे सर्वसामान्य अफगाणि जनतेच्या यातनांमध्ये भर पडणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

काबुल, 14 सप्टेंबर : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानचं (Taliban) सरकार आल्यानंतर आता असं एक मंत्रालय (Minister) सुरु होतंय, ज्यामुळे सर्वसामान्य अफगाणि जनतेच्या यातनांमध्ये भर पडणार आहे. तालिबानची यापूर्वी जेव्हा अफगाणिस्तानमध्ये सत्ता होती, तेव्हादेखील हे मंत्रालय स्थापन करण्यात आलं होतं. या मंत्रालयाचं नाव आहे सदाचार मंत्रालय. (Ministry of virtue and vice) शरिया कायद्यावर आधारित नियमांचं पालन होतंय की नाही, यावर लक्ष ठेवणारं आणि गुन्ह्यांसाठी शरिया कायद्यानुसार शिक्षा ठोठावणारं हे मंत्रालय सामान्यांसाठी त्रासदायक ठरणार आहे. या मंत्रालयाची जबाबदारी मोहम्मद खलील यांच्याकडे असणार आहे. असं असेल सदाचार मंत्रालय न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या बातमीनुसार या मंत्रालयाच्या स्थापनेनंतर अफगाणिस्तानातील जनतेची अवस्था अधिकच बिकट होणार आहे. अफगाणिस्तानमध्ये शरिया कायदा औपचारिकरित्या लागू झाल्यानंतर सर्वाधिक बंधनं महिलांवर येणार आहे. महिलांना बुरखा न घातला बाहेर पडता येणार नाही. पुरुष नातेवाईक असल्याशिवाय कुठल्याही काऱणासाठी महिला घराबाहेर पडू शकणार नाहीत. पुरुषांना दाढी वाढवणं बंधनकारक असेल. संगीत आणि मनोरंजनाच्या इतर सर्व साधनांवर पूर्णतः बंदी असेल. चित्रपट पाहणे, संगीत ऐकणे आणि इतर कुठल्याही प्रकारचं मनोरंजन या गोष्टी गुन्हा असणार आहेत. शरिया कायद्यानुसार असतील शिक्षा शरिया कायद्यात ज्या शिक्षांची तरतूद आहे, त्याच शिक्षा यापुढे अफगाणिस्तानात लागू होणार आहेत. म्हणजेच जाणीवपूर्वक कुणी एखाद्याचा खून केला, तर त्याला जाहीर फाशी देण्यात येईल. जर चुकून एखाद्याने हत्या केल्याचं सिद्ध झालं, तर त्याच्याकडून त्याची किंमत वसूल केली जाईल. एखाद्यानं चोरी केल्याचं सिद्ध झालं, तर त्याचे हात कापण्यात येतील. तर अनैतिक संबंध ठेवल्याचं सिद्ध झालं, तर जाहीररित्या दगडांनी ठेचून त्या व्यक्तीची हत्या करण्यात येईल. हे वाचा - ISI आणि ISKP ची छुपी युती, पाकिस्तानकडून तालिबानच्याही पाठीत खंजीर 1996 साली तालिबानची सत्ता आल्यानंतर या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली होती. त्याचवेळी हे सर्व कायदे अफगाणिस्तानात लागू करण्यात आले होते. अमेरिकेनं अफगाणिस्तानवर हल्ला करेपर्यंत हे नियम अफगाणिस्तानात लागू होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या