JOIN US
मराठी बातम्या / विदेश / ना लॉकडाऊन, ना मोठ्या प्रमाणात टेस्ट; 'या' सवयीने जपानला कोरोनापासून वाचवलं

ना लॉकडाऊन, ना मोठ्या प्रमाणात टेस्ट; 'या' सवयीने जपानला कोरोनापासून वाचवलं

जपानमध्ये (japan) आता अडीच हजारपेक्षाही कमी सक्रिय कोरोना रुग्ण (active coronavirus patient) आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

टोकियो, 01 जून : जपानमध्ये (Japan) आतापर्यंत एकूण 16,804 प्रकरणं आहेत, तर  886 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे 14,406 रुग्ण बरे झालेत, याचा अर्थ जपानमध्ये अडीच हजारपेक्षाही कमी सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. ना लॉकडाऊन (lockdown), ना मोठ्या प्रमाणात टेस्ट (test), ना कोणतेही प्रतिबंध असं असतानाही इतर विकसित देशांच्या तुलनेत जपानमध्ये कोरोनाव्हायरसचं संक्रमण कमी कसं आहे? तज्ज्ञांच्या मते, जापनीज लोकांच्या सवयीनेच त्यांना कोरोनाव्हायरसपासून वाचवलं आहे. तज्ज्ञांच्या मते, जपानमध्ये संक्रमण अपेक्षेपेक्षा कमी पसरणं यामागे मोठं कारण आहे ते म्हणजे जापनीज लोकांना दैनंदिन आयुष्यात सातत्याने मास्क घालण्याची सवय आहे. जपानमध्ये बहुतेक लोक पराग कणांच्या अॅलर्जीपासून वाचण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीपासूनच वसंत ऋतूपर्यंत मास्क घालतात. शिवाय इन्फ्ल्यूएंझापासून बचाव करण्यासाठीदेखील काही लोकं नियमित मास्क वापरतात.

संबंधित बातम्या

एकिकडे अमेरिकेत मास्कला तितकं प्राधान्य दिलं जात नाही तर दुसरीकडे याच मास्कमुळे जपान कोरोनाविरोधातील लढा जिंकत आहे. हे वाचा -  लॉकडाउनमध्ये सूट देणे किती फायदेशीर? धक्कादायक माहिती आली समोर जपानमध्ये आपात्कालीन स्थिती हटवण्यात आली असून आर्थिक आणि सामाजिक व्यवहार हळूहळू सुरू झालेत. जपानमध्ये सक्तीची लॉकडाऊनची स्थिती नव्हती मात्र सोशल डिस्टन्सिंगचं पूर्ण देशानं काटेकोर पालन केलं. एक्सपर्ट पॅनेलचे उपाध्यक्ष आणि महासाथीचे तज्ज्ञ शिगेरू ओमी यांच्या मते, जपानमध्ये या जागतिक महासाथीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरलं कारण इथली लोकं आरोग्य प्रती जागरूक आहेत. म्हणजे या लोकांनी पूर्णपणे खबरदारी घेतली. हात धुण्यापासून ते सार्वजनिक स्वच्छतेच्या प्रत्येक निर्देशाचं या देशातील नागरिकांनी पालन केलं. हे वाचा -  कोरोना योद्धांसाठी ‘आयुष’ची औषधी ढाल; व्हायरसपासून करणार बचाव जपानमधील कोरोनाव्हायरसचा कमजोर स्ट्रेन असणं हेदेखील देशातील प्रकरणं कमी असण्यामागील एक कारण असू शकतं, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. संकनल, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या