नवी दिल्ली 21 ऑगस्ट : अल कायदाचा दहशतवादी ओसामा बिन लादेन यानं आपल्या मृत्यूच्या आधी एक पत्र लिहिलं होतं, जे सध्या व्हायरल होत (Osama Bin Laden Letter Viral) आहे. यात त्यानं आपल्या संघटनेच्या हीट स्क्वाडला अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा आणि सीआयएचे माजी महासंचालक डेव्हिड पेट्रोस यांना ठार मारण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानं यात बायडेन यांना सोडण्यास सांगितलं होतं. लादेननं म्हटलं होतं, की बायडेन राष्ट्राध्यक्ष पदासाठी पूर्णपणे तयार नाही आणि ओबामांला मारल्यानंतर ते राष्ट्राध्यक्ष बनल्यास अमेरिका संकटात सापडेल. 2010 मध्ये लादेनने लिहिलेले हे 45 पानांचे पत्र (Osama Letter Joe Biden) पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या कंपाऊंडमध्ये सापडलेल्या कागदपत्रांमधील आहे. जिथे 2011 मध्ये अमेरिकन सैनिकांनी लादेनला ठार मारलं. लादेननं दोन गट पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तैनात करण्यास सांगितले होते. जेणेकरून पेट्रोस आणि ओबामा यांना मारण्यासाठी त्यांच्यातील कोणाच्या तरी एकाच्या विमानावर निशाणा साधता येईल. दिलासादायक! तालिबाननं अपहरण केलेले सर्व भारतीय सुखरुप हे पत्र सर्वात आधी 2012 मध्ये समोर आलं होतं. मात्र आता हे पत्र पुन्हा एकदा चर्चेत यामुळे आलं आहे, कारण अफगाणिस्तानातून अमेरिकेनं आपलं सैन्या माघारी घेतलं आहे आणि अफगाणिस्तानावर तालिबानींनी कब्जा केला आहे. अफगाणिस्तानला कठीण काळात एकटं सोडल्यानं त्यांच्यावर टीका होत आहे. चुकून भारतीय सीमेत आली पाकिस्तानी मुलं, भारतीय जवानांनी दिलेली वागणूक पाहून… तालिबान आणि अल कायदा यांच्यात बरीच जवळीक (Al Qaeda and Taliban Relations) असल्याचं म्हटलं जातं. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा याचा आरोप ओसामा बिन लादेनवर झाला. यानंतर तो अफगाणिस्तानाच लपला असल्याचं समोर आलं. यानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानवर हल्ला केला आणि तालिबानची सत्ता उधळून लावली. यावर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर बायडेन यांनी अफगाणिस्तानातून आपली सैन्य वापसी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर लगेचच तालिबानींनी या देशावर पुन्हा कब्जा मिळवला.