नेपाळ : सौंदर्यानं नटलेल्या नेपाळमध्ये मोठं अस्मानी संकट ओढवलं आहे. नेपाळमध्ये भूस्खलन झालं. काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या भूस्खलनात आतापर्यंत १३ जणांनी जीव गमवल्याची माहिती मिळाली आहे.
भूस्खलनात १० जण अजूनही बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य सुरू आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्यांना रेस्क्यू केलं जात आहे.